Beed Sugarcane Protest | पाडळशिंगीतील रास्ता रोकोप्रकरणी विवेकानंद पाटील, रविराज साबळे-पाटील यांच्यासह २00 जणांवर गुन्हे

ऊसदराच्या मागणीसाठी दोन तास महामार्ग रोखला; दहा किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
Beed Sugercane Protest | पाडळशिंगीतील रास्ता रोकोप्रकरणी विवेकानंद पाटील, रविराज साबळे-पाटील यांच्यासह २00 जणांवर गुन्हे
Beed Sugercane Protest | पाडळशिंगीतील रास्ता रोकोप्रकरणी विवेकानंद पाटील, रविराज साबळे-पाटील यांच्यासह २00 जणांवर गुन्हे
Published on: 
Updated on: 

गेवराई : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन ४ हजार २०० रुपये दर मिळावा, तसेच दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात यावी, यासह विविध मागण्यांसाठी पाडळशिंगी टोलनाका येथे करण्यात आलेल्या रास्ता रोको आंदोलनप्रकरणी पोलिसांनी २५० जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये एमपीएससी आंदोलनातून राज्यभर चर्चेत आलेले युवा वक्ते विवेकानंद पाटील आणि शेतकरी नेते रविराज साबळे पाटील यांचाही समावेश आहे.

बीड जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कारखानदारांकडून योग्य दर मिळावा आणि दुष्काळामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी, या मागण्यांसाठी पाडळशिंगी टोलनाका येथे सलग दोन दिवस आंदोलन करण्यात आले. शुक्रवारी झालेल्या आंदोलनात शेतकऱ्यांनी सुमारे एक तास महामार्ग रोखला होता. त्यानंतर शनिवारी विवेकानंद पाटील आणि शेतकरी नेते रविराज साबळे पाटील यांच्या उपस्थितीत आंदोलन अधिक तीव्र झाले.

आंदोलकांनी टोलनाक्यावरच धुळे-सोलापूर महामार्गावर ठिय्या दिल्याने दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प झाली. सुमारे दोन तास वाहतूक कोंडी निर्माण झाल्याने महामार्गावर दोन्ही बाजूंनी जवळपास दहा किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. यामुळे प्रवासी आणि वाहनधारकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. दरम्यान, पोलिस आणि आंदोलकांमध्ये शाब्दिक चकमकही झाली. आयजी वीरेंद्र मिश्रा यांनाही या वाहतूक कोंडीचा फटका बसल्याची माहिती आहे.

दरम्यान, आंदोलनासाठी पूर्वपरवानगी न घेणे, जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करणे आणि चिथावणीखोर भाषणे केल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. गेवराई पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार विशाल कांबळे यांच्या तक्रारीवरून विवेकानंद पाटील, रविराज साबळे पाटील, चेतन बहिर, अमोल मुंजाळ, संतोष उखाडे, आर्यन जाधव, विजय काळे यांच्यासह एकूण २५० जणांविरोधात विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांच्या ऊसदराचा प्रश्न आणि दुष्काळी मदतीच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांवर गुन्हे दाखल झाल्याने आता या प्रकरणाची गेवराई तालुक्यात चर्चा सुरू झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.