Beed Accident : भरधाव कारची बसला धडक; चालक जखमी

निष्काळजीपणाने वाहन चालविल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा दाखल
Beed Accident News
भरधाव कारची बसला धडक; चालक जखमी
Published on
Updated on

गेवराई : भरधाव कारची बसला धडक बसून झालेल्या अपघातात कारचालक जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना मंगळवारी (दि. २४) सकाळीच्या सुमारास धुळे–महामार्गावरील गेवराई बायपासजवळ कॅप्टन पंपासमोर घडली. याप्रकरणी कारचालकावर निष्काळजीपणाने वाहन चालविल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रमेश संभाजी ओव्हळ (वय ४६, व्यवसाय एस.टी. ड्रायव्हर, रा. सारणी सांगवी, ता. केज, जि. बीड) हे बस चालवत असताना, समोरून येणाऱ्या (एम.एच. २० इ.एल. ५२७७) क्रमांकाच्या डिझायर कारने भरधाव वेगात येत त्यांच्या बसला धडक दिली. ही घटना सकाळी सुमारे ९.१५ वाजण्याच्या सुमारास घडली. अपघातात कार चालक जखमी झाला असून, बसचेही नुकसान झाले आहे. याप्रकरणी संबंधित कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक पारधी करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news