Beed News | जिल्ह्यातील सोनोग्राफी सेंटर्सची होणार तपासणी

स्त्रीजन्मदराची आकडेवारी समोर येताच प्रशासन ॲक्शन मोडमध्ये!
Beed sonography center inspection
Beed News| जिल्ह्यातील सोनोग्राफी सेंटर्सची होणार तपासणीpudhari photo
Published on
Updated on

बीड ः बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा स्त्रीजन्म दरात घट झाली आहे. याबाबतचे वृत्त दैनिक पुढारीतून प्रकाशित करण्यात आले होते. यानंतर आता जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सतीशकुमार सोळंके यांनी तपासणी मोहीम सुरू केली जाणार असल्याची माहिती दिली आहे.

स्त्रीभ्रूणहत्या, गर्भलिंग निदान आणि घटता स्त्री जन्मदर यामुळे काही वर्षांपूर्वी बीड जिल्हा चर्चेत आला होता. त्यावेळी राज्य सरकारने खडबडून जागे होत बीड जिल्ह्यात ठोस पावले उचलत स्त्री जन्मदर वाढावा यासाठी प्रयत्न केले होते त्याचा परिणाम म्हणून गतकाही वर्षांमध्ये हा जन्मदर वाढलादेखील होता, परंतु आता पुन्हा एकदा हा जन्मदर घटत असल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे.

Beed sonography center inspection
Nakushi Tarihi Havi Havi Shi : दिलासादायक ! नाशिकमध्ये 'नकोशी' झाली हवीहवीशी!

बीड जिल्ह्यातील शासकीय रुग्णालय तसेच नोंदणीकृत रुग्णालयातील नोंदीनुसार हा जन्मदर घटल्याचे समोर आले आहे. वर्षनिहाय आकडेवारी पाहिल्यास... 2021-22 मध्ये एक हजार मुलांमागे 937 मुली जन्मल्या, 2022-23 मध्ये एक हजार मुलांमागे 929 मुली जन्मल्या, 2023-24 मध्ये मात्र हा आकडा एकदम 896 वर पोहचला, 2024-25 मध्ये आणखी कमी होत 861 वर आला. आता सुरू असलेल्या 2025-26 मध्ये फेब्रुवारी अखेरपर्यंत हा आकडा 861 पर्यंत खाली आला आहे.

हा जन्मदर आणखी खाली येऊ नये यासाठी आतापासूनच उपायोजना करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून सध्या बीड जिल्ह्यातील विविध रुग्णालयांमध्ये आरोग्य विभागाकडून गर्भधारणा पूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्र (पीसीपीएनडीटी) कायद्याच्या अंमलबजावणी विषयी आशा स्वयंसेविका तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले जात आहे. तर दुसरीकडे आता तालुकानिहाय पथक नियुक्त करून दोनशेहून अधिक अधिकृत सोनोग्राफी सेंटर्सची तपासणी केली जाणार आहे. यामध्ये काही गैरप्रकार आढळल्यास कारवाई केली जाणार असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सतीशकुमार सोळंके यांनी दिली.

Beed sonography center inspection
Delhi blast Case | अल-फलाह विद्यापीठातून 15 डॉक्टर बेपत्ता; छापासत्र

5 मेपर्यंत सुरू राहणार मोहीम

बीड जिल्ह्यातील सोनोग्राफी सेंटर्सची तपासणी मोहीम 5 मेपर्यंत सुरू राहणार आहे. या तपासणी मोहिमेनंतरही अचानकपणे तपासणीसाठी पथक नियुक्त केले जाणार आहे. बीड जिल्ह्यातील घटता स्त्रीजन्मदर हा चिंतेचा विषय आहे. गर्भलिंगनिदान आणि अवैधपणे गर्भपात करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाणार आहे. अशा पद्धतीने काही गैरप्रकार होत असतील तर तत्काळ प्रशासनाला माहिती कळवावी. माहिती देणाऱ्यांचे नाव गोपनीय ठेवले जाईल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सतीशकुमार सोळंके यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news