Beed accident : साळेगाव येथे परतीच्या दिंडीच्या वाहनाचा तिहेरी अपघात; अपघातातील एकाचा मृत्यू

अपघातात एकूण अकराजण जखमी
Beed accident : साळेगाव येथे परतीच्या दिंडीच्या वाहनाचा तिहेरी अपघात; अपघातातील एकाचा मृत्यू
Published on
Updated on

गौतम बचुटे

केज : साळेगाव येथे केज कळंब दरम्यान वाशिम जिल्ह्यातील दिंडीचे ट्रॅक्टर, एक क्रुझर आणि कारच्या झालेल्या भीषण अपघातात एका वृद्धाचा मृत्यू झाला. या अपघातात 11 जण जखमी झाले आहेत.

दिनांक २९ जुलै, बुधवारी रात्री ८:१५ वाजण्याच्या सुमारास खामगाव सांगोला महामार्ग क्र. ५४८-सी वर केज ते कळंब दरम्यान साळेगाव येथील रामेश्वर कळसकर यांच्या चार्जिंग स्टेशनजवळ वाशिम जिल्ह्यात संत राघोजी महाराज संस्थान बोराळा येथील ह.भ. प. नरहरी नारायण वानखेडे महाराज यांच्या परतीच्या मार्गाने वाशिम जिल्ह्यात परतीच्या मार्गाने, केजच्या दिशेने जात असलेल्या वारकऱ्यांचा ट्रॅक्टरला समोरून येणाऱ्या क्रुझर गाडीची जोराची धडक दिली. या दोन वाहनांची धडक होताच याच रस्त्याने जात असलेली एक कार अपघातग्रस्त वाहनावर धडकली.

Beed accident : साळेगाव येथे परतीच्या दिंडीच्या वाहनाचा तिहेरी अपघात; अपघातातील एकाचा मृत्यू
Beed Accident News : दिंडीहून माघारी परतणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनाचा अपघात

ट्रॅक्टर, क्रूझर आणि कार या तीन वाहनाचा तिहेरी अपघात एवढा भयानक होता की, ट्रॅक्टरचे हेड मधून तुटून त्याचे दोन भाग झाले आहेत. अपघात दिंडीतील ट्रॅक्टरच्या ट्रॉलीत बसून परतीच्या मार्गाने वाशीमकडे जात असलेल्या एका वृद्ध वारकऱ्यांचा अंबाजोगाई येथे उपचारासाठी जात असताना मृत्यू झाला. तर सात वारकरी जखमी झाले आहेत. तसेच क्रूझर मधील चौघे जखमी झाले आहेत. आठ जणांना केज येथील उपजिल्हा रुग्णालयात प्रथमोपचार करून त्यांना अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी हलविले आहे. इतर चौघांना कळंब येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.

Beed accident : साळेगाव येथे परतीच्या दिंडीच्या वाहनाचा तिहेरी अपघात; अपघातातील एकाचा मृत्यू
Beed accident: केज तालुक्यात ऊस तोडणीसाठी बळजबरीने पळवून नेलेल्या मजुराचा अपघातात मृत्यू

अपघाग्रताना केली गावकऱ्यांनी मदत, पोलिसही घटनास्थळी हजर

हा अपघात गावाजवळ झाल्याने गावकरी अपघातातील जखमींच्या मदतीला धावून गेले. या अपघाताची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांच्या आदेशाने सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक बाबासाहेब बांगर आणि त्यांचे सहकारी अपघातस्थळी हजर झाले. अपघातातील जखमींना तीन रुग्णवाहिकेतून रुग्णालयात हलविल्या नंतर अपघातग्रस्त वाहने जेसीबीच्या सहाय्याने रस्त्यावरून बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत करण्यात आली. अपघातात मृत्यू झालेले वृद्ध इसम आणि जखमी हे वाशिम जिल्ह्यातील असल्याने त्यांची नावे अद्याप समजू शकली नाहीत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news