
आष्टी : आष्टी तालुक्यातील सहा परस विहिरीत पडलेल्या नील गाईला वाचविण्यात वन विभागाला यश आले. या गाईला सुखरूप बाहेर काढण्यासाठी वन विभागाच्या टीमने केलेल्या तब्बल दोन तासांच्या प्रयत्नानंतर नील गाईला सुखरूप बाहेर काढण्यात अखेर यश आले.
आष्टी तालुक्यातील खरकटवाडी परिसरात वनक्षेत्रालगत असलेल्या शेतातील विहिरीला संरक्षक कठडे नसल्याने नील गाय सहा परस खोल विहिरीत पडली. या घटनेची माहिती मिळतात वनविभागाचे अधिकारी तात्काळ आले. दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर वनविभागाच्या टीमला नील गाईला वाचविण्यात यश आले. या पथकामध्ये वनविभागाचे वन परिक्षक अधिकारी ढगे ,वनपाल कडा तागड,वनरक्षक काळे, पडलकर,वनकर्मचारी बन्सी तांदळे,कानिफ पवार, गोरख पवार , जयसिंग मोहिते ,अशोक पाथरकर, दत्तात्रय भुकण, इन्नुस शेख, ज्ञानेश्वर मोहिते आदींचा समावेश होता.