Beed Crime : गोदामातून पाय फुटलेली ज्वारी शनिवार सुट्टीच्या रविवारी रेशनच्या दारात! रक्षकावर कारवाई होणार का?

"पुढारी" ने वृत्त प्रकाशित केल्यानंतर प्रशासन खडबडून जागे
Beed Crime : गोदामातून पाय फुटलेली ज्वारी  शनिवार सुट्टीच्या रविवारी रेशनच्या दारात! रक्षकावर कारवाई होणार का?
Beed Crime : गोदामातून पाय फुटलेली ज्वारी शनिवार सुट्टीच्या रविवारी रेशनच्या दारात! रक्षकावर कारवाई होणार का?
Published on: 
Updated on: 

नेकनूर : नेकनूरच्या सरकारी धान्य गोदामातील अनागोंदी कारभारामुळे ऑक्टोबर महिन्यातील ज्वारी रेशन दुकानात पोहोचलीच नाही. याबाबत "पुढारी" ने वृत्त प्रकाशित केल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले. अखेर शनिवारी सुट्टीच्या रविवारी घाईघाईने गोदामातून पाय फुटलेल्या ज्वारीच्या गोण्या रेशन दुकानाच्या दारात आल्या अजून काही दुकानात ज्वारी पोहचणे राहिले आहे.

गोरगरीबांना स्वस्त धान्य वेळेवर मिळावे यासाठी शासन कोट्यवधींचा खर्च करते. मात्र, नेकनूर येथील धान्य गोदामाचा कारभार मात्र पूर्णपणे ढासळल्याचे चित्र आहे. ऑक्टोबर महिन्याचा ज्वारीचा साठा गोदामातून वितरितच न झाल्याने लाभार्थी नागरिकांना उपासमारीची वेळ आली होती.

"पुढारी" ने वृत्त दिल्यानंतर हालचाली

या संदर्भात "पुढारी" ने गोदामातील भ्रष्टाचार आणि ज्वारी गायब झाल्याचे वृत्त 19 नोव्हेंबर च्या अंकात ठळकपणे प्रकाशित केले होते. वृत्त प्रकाशित होताच प्रशासनाची एकच धावपळ उडाली. अखेर शासकीय सुट्टी असलेल्या रविवारी ज्वारीच्या पाय फुटलेले पोते रेशन दुकानात आले.

पण प्रश्न हा आहे की, महिनाभर ज्वारी का थांबवून ठेवली होती? आणि आता अचानक घाई का करण्यात आली? असे प्रश्न यामुळे निर्माण झाले आहेत. गोदामातील साठ्याची योग्य नोंद न ठेवणे, धान्य वेळेवर न पाठवणे आणि आता घाईघाईने निकृष्ट दर्जाचे धान्य वितरणासाठी पाठवणे याचबरोबर कट्टे वजनात कमी या सर्व प्रकारामुळे "रक्षकच भक्षक बनला आहे का?" असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

स्थानिक नागरिकांची मागणी आहे की, ऑक्टोबर महिन्याच्या ज्वारी प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदार असलेल्या गोदाम व्यवस्थापक आणि संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.