

गौतम बचुटे
केज : तालुक्यातील एका गावातून एका १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला एका भिन्न धर्मीय तरूणाने अज्ञात कारणासाठी फूस लावून पळवून नेले आहे. २३ एप्रिल रोजी एका मुलीचे आई-वडील हे नातेवाईकांच्या कार्यक्रमासाठी नेकनुर येथे गेले होते. रात्री आई-वडील घरी आल्या नंतर त्यांना त्यांची मुलगी घरी नसल्याचे निदर्शनास आल्या नंतर त्यांनी मुलीचा शोध घेतला. मात्र मुलगी आढळून आली नाही.
त्यानंतर मुलीच्या भावाच्या मोबाईल नंबरवर त्यांना अंबाजोगाई तालुक्यातील एका गावच्या ग्रामपंचायत सदस्याने कळविले की, बेपत्ता असलेल्या मुलीला घेऊन, एक भिन्न धर्मीय तरुण हा अंबाजोगाई तालुक्यातील त्याच्या आजोळी गेलेला असल्याचे समजले.
मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून त्यांच्या गावातील भिन्न धर्मीय इसम हा त्याच्या १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला अज्ञात कारणासाठी फूस लावून पळवून गेल्याची तक्रार मुलीच्या वडिलांनी केज पोलिस ठाण्यात दिली आहे. त्यावरून भिन्न धर्मीय इसमा विरुद्ध गु. र. नं. २४३/२०२६ भा. न्या. सं. १३७(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक उमेश निकम हे करीत आहेत.