'आम्ही सिनेमामधील पोलीस नाही...'; बीडमधील पोलिसाची भावनिक पोस्ट व्हायरल

Santosh Deshmukh Murder Case | अंजली दमानियांचा पोस्टमध्ये उल्लेख
Beed  Police News
प्रातिनिधिक छायाचित्र File photo
Published on
Updated on

बीड, पुढारी वृत्तसेवा: संतोष देशमुख खून प्रकरणाच्या तपासाबाबत अनेकांकडून शंका व्यक्त केल्या जात आहेत. यादरम्यान पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जात आहे. या आरोपांवरून व्यथीत झालेले पोलीस हवालदार भागवत शेलार (Bhagwat Shelar) यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकून आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. (Santosh Deshmukh Murder Case )

शेलार यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, अंजलीताई काम करूनही बदनामी झाली की, काय त्रास होतो, हे तुम्हाला कोण सांगणार? इमानदारी केली तिथे कौतुक नाही. पण किमान अर्धी माहिती घेऊन मानसिक त्रास देऊ नका, अशी विनंती शेलार यांनी केली आहे. रोज टीव्हीला नाव येत असल्याने मुलं आणि बायको देखील विचारते तुम्ही काम करता तरीसुद्धा तुमचं नाव टीव्ही ला कसं काय येतंय. गेल्या ७५ दिवसांत आरोपींना पकडण्यासाठी रानावनात फिरतोय. नदी नाल्यात फिरतोय, काट्या कुपाट्या बघितल्या नाही.. कारण उद्देश एकच होता आरोपींना पकडायचं. तरीदेखील आरोप होत असल्याने आता मन व्यथीत होत आहे.

भागवत शेलार यांची भावनिक पोस्ट
भागवत शेलार यांची भावनिक पोस्ट

आरोपी पकडताना कोणाची तरी मदत घ्यावीच लागते (आणि ते आरोपीच्या जवळचे असले तर लवकर यश येते, उद्देश फक्त आरोपी पकडणे हा असतो) आम्ही काही पिचर मधले पोलीस नाही की, आम्हाला तिसरा डोळा आहे. आणि लगेच दिसले की पकडले. त्यासाठी लोकांवर विश्वास टाकावा लागतो (काही हरामखोर विश्वास घात करतात) त्यांचा विश्वास संपादन करावा लागतो. आणि काम करताना चुका ही होऊ शकतात.

याच्या बदल्यात काय मिळाले, तर शेलार "वाल्मीक कराड" साठी काम करतो.

शेलार "सुरेश धस साहेब "यांच्या साठी काम करतो.

अरे बाबांनो, मी पोलिस खात्यासाठी काम करतो. अन् पगार घेतो. काम करताना वडिलांना (भाऊ) आठवतो की, त्याचं नाव खराब नाही झाले पाहिजे. गेल्या ७५ दिवसांत किती मेहनत घेतली. किती रात्रीचा प्रवास केला आणि किती आर्थिक भार पडला, हे माझ्या मनाला माहित आहे. एवढा त्रास घेऊन काय भेटलं तर फक्त बदनामी. बायको, मुलं रोज विचारतात पप्पा तुमचं नाव काम करून पण टीव्हीला का येते. काय सांगू त्यांना किती मानसिक त्रास होत असेल मला. प्रामाणिक काम करण्याचा, याचा विचार करावा. आज ही जिल्हा पोलीस अधीक्षक आणि आमचे प्रभारी अधिकारी यांनी दाखवलेल्या विश्वासामुळे फरार आरोपीचा शोध घेत आहोत. देव आम्हाला लवकर यश देवो.

संतोष अण्णा कोणी काही म्हणो, तुम्हाला न्याय व्यवस्था नक्की न्याय देईल, हा विश्वास आहे, असे शेलार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news