Beed crime news | चोरीच्या उद्देशाने संशयितरीतीने फिरणाऱ्या दोघांना पिकअसह ताब्यात घेतले

ताब्यात घेतलेल्या दोघांनी जिल्ह्यात आणि जिल्ह्याबाहेर गंभीर गुन्ह्यात समावेश असल्याची शक्यता
  Crime  News
Crime NewsPudhari file photo
Published on
Updated on

गौतम बचुटे

केज : तालुक्यात रात्रीच्या अंधारात चोरीच्या उद्देशाने संशयितरित्या तोंड झाकून दोन अनोळखी इसम फिरत असल्याची माहिती मिळताच केज पोलिसांनी तात्काळ कारवाई करून त्यांना एका पीक-अपसह ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेले सराईत गुन्हेगार आणि त्यांनी गंभीर गुन्हा केल्याची शक्यता असून पोलिस तपास करीत आहेत.

केज तालुक्यातील नाव्होली येथील पुलाजवळ दि. २९ रोजी मध्यरात्री २:३० वाजण्याच्या सुमारास दोन अनोळखी इसम हे कपड्याने तोंड झाकून संशयितरित्या चोरी करण्याच्या उद्देशाने रात्रीच्या अंधार फिरत असल्याची माहिती रात्र गस्तीवर असलेले पोलिस उपनिरीक्षक बाळासाहेब रोडे यांना ११२ क्रमांकावर खंडू बिक्कड याने दिली. माहिती मिळताच प्रभारी पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या आदेशाने पोलिस उपनिरीक्षक बाळासाहेब रोडे, पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश मुंडे, पोलिस कॉन्स्टेबल गोत्राळ, पोलिस कॉन्स्टेबल शिंदे हे रात्री ३:०० वाजण्याच्या सुमारास घटनास्थळी हजर झाले.

पोलिसांनी नाव्होली शिवारात केज ते नांदुरघाट जाणारे रोडवर पुला जवळ अशोक सोनाजी गायकवाड वय (२४ वर्षे) (रा. पात्रुड ह.मु. आनंदगाव ता. माजलगाव जि. बीड) आणि वैजेनाथ दगडु कदम वय (२० वर्षे, रा. कोथरुड ता. माजलगाव जि. बीड) या दोघांना ताब्यात घेतले. तसेच त्यांनी चोरी करण्याच्या उद्देशाने विना नंबर प्लेटचे मालकवाहू पीक-अप ताब्यात घेतले. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब रोडे यांच्या तक्रारीवरून केज पोलिस ठाण्यात अशोक सोनाजी गायकवाड वय (२४ वर्षे) (रा. पात्रुड ह.मु. आनंदगाव ता. माजलगाव जि. बीड) आणि वैजेनाथ दगडु कदम वय (२० वर्षे, रा. कोथरुड ता. माजलगाव जि. बीड) या दोघांच्या विरुद्ध गु. र. नं. १६१/२०२६. भा. न्या. सं. १२२ नुसार गुन्हा दाखल झाला आहे. नांदुर दुरक्षेत्राचे पोलिस हेडकॉन्स्टेबल उमेश आघाव हे पुढील तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news