

केज : तुझ्या मुलीचे माझ्या सोबत लावून दे असे म्हणून अल्पवयीन मुलगी आणि तिच्या आईचा विनयभंग करणाऱ्या केज तालुक्यातील आशिष अशोक धिवार या २८ वर्षीय तरुणाचा बीड येथील न्यायालयीन कोठडीत असताना उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. तर त्याचा मृत्यू हा पोलिसांच्या मारहाणीत झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
केज तालुक्यातील काळे गाव घाट येथील आशिष अशोक धिवार या २८ वर्षीय तरुणावर गावातील एका महिलेच्या आरोपा वरून असा गुन्हा दाखल करण्यात आला होता की,. दि.१८ एप्रिल रोजी सायंकाळी ६:०० वा. च्या सुमारास एक तरुण दारु पिऊन घराचे पाठीमागे लावलेले पत्र्याचे शेडवरुन उडी मारुन आत आला होता. त्याने विवाहित महिलेच्या अंगाशी झोंबाझोंबी केली. त्याचा जाब विचारताच त्याने त्या विवाहितेला शिवीगाळ केली आणि म्हणाला की, "तुझ्या मुलीला माझ्या सोबत लग्न करण्यास सांग." असे म्हणुन मुलीच्या अंगाला वाईट उद्देशाने स्पर्श केला. तसेच म्हणाला की, मुलीचे लग्न जर त्याच्या सोबत केले नाही, तर लैंगिक अत्याचार करण्याची धमकी दिली होती.
त्या नंतर ती महिला व तिच्या पतीने याचा त्याला जाब विचारला असता त्याने पुन्हा त्यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करून धारदार विळ्याने जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. या आशयाच्या तक्रारी वरून आशीष अशोक धिवार याच्या विरुद्ध केज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक सुकुमार बनसोडे यांनी आशिष धिवार यास दि. २३ रोजी ताब्यात घेऊन त्याला न्यायालया समोर हजर केले असता न्यायालयाने त्याला दि. २४ एप्रिल पर्यंत दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती.
त्या नंतर त्याला दि. २५ रोजी न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली असल्याने त्याची रवानगी ही बीड येथील कारागृहात अरण्यात आली होती. त्याची रवानगी कारागृहात झाल्यानंतर तो त्याची प्रकृती बिघडली आणि त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता दि. २७ एप्रिल रोजी रात्री त्याचा मृत्यू झाला. त्याच्या नातेवाईकांनी असा आरोप केला आहे की, त्याला पोलिसांनी अमानुष मारहाण केली असल्याने त्याला गंभीर इजा झाली. आणि त्यामुळे त्याचा मृत्यू झाला.
पोलिसांनी पैसे मागितल्याचा आरोप
मयताचा भावाने फोनवरून माहिती दिली की, आशिष याला पोलिसांनी घेऊन जात असताना अमानुष मारहाण केली. तसेच त्याला यातून सुटण्यासाठी एक लाख रु. ची मागणी केली. आणि मारहाणीची माहिती न्यायालयात देऊ नको म्हणून दबाव टाकला. तसेच आशिष याला बीड येथील दवाखान्यात दाखल केल्याची माहिती दिली.
घटनाक्रम :-
१८ एप्रिल रोजी काळेगाव घाट येथे विनयभंगाची घटना
१९, एप्रिल रोजी विनयभंग आणि पोक्सोचा गुन्हा दाखल
२३ एप्रिल रोजी अटक
२४ पर्यंत पोलिस कोठडी
२५ एप्रिल रोजी न्यायालयीन कोठडी व न्यायालयीन कोठडीत रवानगी
२७ एप्रिल रोजी जिल्हा कारागृहातून जिल्हा रुग्णालयात दाखल
२८ रोजी मृत्यू झाल्याची पोलिसांकडून नातेवाईकांना माहिती