Parli Gambling Raid | शेतात ‘तिरट’चा डाव; २० जणांवर कारवाई; ३७ लाख ३४ हजारांचा मुद्देमाल जप्त

परळी-अंबाजोगाई रस्त्यालगत कन्हेरवाडी शिवारातील शेतातील एका पत्र्याच्या शेडमध्ये ‘तिरट’ जुगार सुरू
Gambling Raid
Gambling RaidPudhari
Published on
Updated on

Beed Gambling Den Raid

परळी वैजनाथ : शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये गुपचूप सुरू असलेल्या ‘तिरट’ जुगाराच्या अड्ड्यावर परळी ग्रामीण पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली. या कारवाईत जुगार खेळणाऱ्या १८ जणांसह जुगार चालविणारा आणि जुगारासाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्या अशा एकूण २० जणांवर कारवाई करण्यात आली. पोलिसांनी रोख रक्कम, विविध कंपन्यांचे मोबाईल, दुचाकी व चारचाकी वाहने असा एकूण ३७ लाख ३४ हजार २७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

परळी-अंबाजोगाई रस्त्यालगत कन्हेरवाडी शिवारातील शेतातील एका पत्र्याच्या शेडमध्ये ‘तिरट’ जुगार सुरू असल्याची माहिती परळी ग्रामीण पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार २७ ऑगस्ट रोजी दुपारी सुमारे ३.४० वाजता पोलिसांनी तेथे छापा टाकला. यावेळी काही जण पत्त्यांवर पैसे लावून जुगार खेळत असल्याचे, तर काही जणांकडून जुगार खेळविला जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

Gambling Raid
Parli Vaijnath Temple: एकादशी अन् दुसरा श्रावण सोमवार एकत्र: परळीत वैद्यनाथाच्या दर्शनासाठी दोन दिवसांपासून गर्दी

१८ जुगाऱ्यांसह दोघांवरही कारवाई

या प्रकरणात शेख निजाम फकिर अहमद, बालाजी नाथराव मुंडे, नागेश बाबुराव वाघमारे, गणेश व्यंकटी गर्जे, हनुमंत विष्णू मुंडे, बालाजी हनुमंत मुंडे, अनंत विठ्ठल कराड, शिवाजी केशव उघडे, सुरेश प्रल्हाद गजेवाड, पंजाबराव हरिश्चंद्र मोकाशे, तात्याराव रामराव काटेकर, प्रदीप बबन शहाणे, सिद्धेश्वर पांडुरंग मुसळे, राम महादेव गुट्टे, नागनाथ यादवराव यंमगर, अमोल हरीभाऊ मुंडे, नितीन निवृत्ती गर्जे आणि निवृत्ती सुग्रीव गर्जे यांच्यावर जुगार खेळल्याचा आरोप आहे.तर शंकर पंढरीनाथ फड याच्यावर जुगार चालविल्याचा आणि प्रकाश माणिक फड याच्यावर जुगारासाठी जागा उपलब्ध करून दिल्याचा आरोप आहे.

रोख रक्कमेसह वाहने, महागडे मोबाईल जप्त

पोलिसांनी केलेल्या कारवाईत रोख रकमेसह विवो, सॅमसंग, ओपो, आयफोन यांसह विविध कंपन्यांचे मोबाईल, हिरो स्प्लेंडर, होंडा शाईन, हिरो पॅशन प्रो यांसारख्या दुचाकी तसेच महिंद्रा स्कॉर्पिओ आणि टाटा पंच यांसारखी चारचाकी वाहने जप्त केली.पोलिसांच्या माहितीनुसार, जप्त करण्यात आलेल्या सर्व मुद्देमालाची एकत्रित किंमत ३७ लाख ३४ हजार २७० रुपये आहे.

Gambling Raid
Parli Crime | पोलीस भरतीच्या सरावावरून परतणाऱ्या दोन महिलांचा पाठलाग करून विनयभंग, पतीसोबत झटापट

महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा

या कारवाईचा पंचनामा परळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मल्हार शिवरकर यांनी दोन पंचांसमक्ष केला. जप्त मुद्देमाल तपासकामी पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अंकुश ज्ञानेश्वर निमोणे यांच्या फिर्यादीवरून परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गु.र.नं. ४०६/२०२६, महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ४ व ५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अंमलदार क्षीरसागर यांनी केली असून, पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक पागोटे करीत आहेत. पोलीस निरीक्षक मल्हार शिवरकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या कारवाईमुळे ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बेकायदा जुगार अड्डे चालविणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news