Gutka Seized Parli | परळी पोलिसांची धडक कारवाई; गुटखा व पान मसाला जप्त, एक जेरबंद

चारचाकीसह २ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त
Gutka Seized
Gutka SeizedFile Photo
Published on
Updated on

Illegal Gutka Raid Parli

परळी : परळी ग्रामीण पोलिसांनी टोकवाडी फाटा परिसरात कारवाई करत अवैध गुटखा आणि पान मसाल्याचा साठा जप्त केला. या कारवाईत एका आरोपीला अटक करण्यात आली असून चारचाकीसह एकूण २ लाख ५० हजार ५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २० एप्रिल २०२६ रोजी रात्री सुमारे ८.५० वाजण्याच्या सुमारास नागापूर फाटा ते टोकवाडी मार्गावर पोलिसांनी ही कारवाई केली. आरोपी दत्तात्रय ज्ञानोबा मुंडे (वय ४०, रा. टोकवाडी, ता. परळी) हा आपल्या कारमधून अवैध पान मसाल्याची वाहतूक करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

Gutka Seized
Beed Crime News | मस्साजोग शिवारात १० लाखांचा गुटखा साठा जप्त

पोलिसांनी सापळा रचून वाहनाची तपासणी केली असता विविध प्रकारचा गुटखा आढळून आला. या पान मसाल्याची किंमत ५० हजार ५० रुपये असून, गुन्ह्यात वापरलेली सुमारे २ लाख रुपये किमतीची पांढऱ्या रंगाची कारही जप्त करण्यात आली.

या प्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार नवनाथ हरगावकर यांच्या फिर्यादीवरून कारवाई करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news