Beed Officer Death
विलास डोगरे(Pudhari Photo)

Beed Officer Death | बीडमध्ये खळबळ: पंचायत समितीच्या विस्तार अधिकाऱ्याने गळफास घेऊन जीवन संपविले

Beed News : शिवाजीनगर परिसरात बीड पंचायत समिती कार्यालयात कार्यरत
Published on

Beed latest news

परळी वैजनाथ : परळी वैजनाथ शहरातील शिवाजीनगर परिसरात बीड पंचायत समिती कार्यालयात कार्यरत असणारे विस्तार अधिकाऱ्याची गळफास घेऊन जीवन संपविले. ही घटना गुरुवारी (दि. ११) सकाळच्या सुमारास घडली. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, परळी वैजनाथ शहरातील शिवाजीनगर भागात वास्तव्यास असलेले व बीड पंचायत समिती कार्यालयातील विस्तार अधिकारी यांनी गळफास घेतला. विलास डोगरे असे मृत विस्तार अधिकाऱ्याचे नाव आहे. या घटनेचे कारण मात्र समजले नाही.

Beed Officer Death
Sambhajinagar News : मनपाकडून बीड बायपासअंतर्गत रस्त्यावर पाडापाडीची तयारी

विलास डोगरे यांच्या पाश्चत तीन मुली, आई पत्नी, भाऊ असा परिवार आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. विलास डोगरे यांनी परळी पंचायत समिती कार्यलया अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचाय मध्ये ग्रामविकास अधिकारी म्हणून सेवा बजवाली आहे. धर्मापुरी, सिरसाळा, कन्हेवाडी, अशा अनेक गावांत त्यानी चांगले काम करुन दाखवले आहे. विलास डोगरे यांच्या पार्थिवावर परळी तालुक्यातील खामगाव येथे सायंकाळी अंत्यसंस्कार होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news