

केज :- केज तालुक्यातील कानडीमाळी येथे वीज उपकेंद्र तपासणी करण्यासाठी गेलेल्या एका महिला अभियंत्यास मद्याच्या अंमलाखाली असलेल्या ऑपरेटरने गैरवर्तन करून त्यांच्याशी हुज्जत घातली असल्याचा गंभीर प्रकार घडला आहे.
या बाबतची माहिती अशी की, केज येथील महावितरणच्या कनिष्ठ अभियंता सौ. शीतल वाजेद अली सय्यद या दि. १४ नोव्हेंबर रोजी रोजी रात्री १०:४५ वा. च्या सुमारास कानडी माळी येथे महावितरण उपकेंद्र तपासणीसाठी गेल्या होत्या. त्यावेळी तेथे कर्तव्यावर असलेले यंत्रचालक शंकर ठोंबरे वय (४६ वर्षे) यांनी त्यांच्या अधिकारी तथा कनिष्ठ अभियंता सौ. शितल सय्यद या महिला अधिकाऱ्या सोबत विनाकारण विनाआवश्यक गोष्टींसाठी वाद घालून जोरजोरात ओरडू लागले. ऑपरेटर यांचा दारू पिण्याचा वास येवू लागला. त्यामुळे श्रीमती सय्यद यांनी त्यांना दारू पिले आहात का ? असे विचारले असता ते मला म्हणाले की, मी दारू पिलेलो नाही. त्यांना दारू पिण्याच्या संशया वरून वैद्यकीय तपासणी करून घेण्याबाबत सांगितले असता वैद्यकीय तपासणी करण्यास त्यांनी विरोध केला. ही माहिती कनिष्ठ अभियंता शितल सय्यद यांनी त्यांचे वरिष्ठ कार्यकारी अभियंता यांना दिली.
त्या नंतर दि. १५ नोव्हेंबर रोजी शंकर ठोंबरे यांना दारु पिण्याच्या संशयावरुन वैद्यकीय तपासणीचे पत्र दिले. त्यांचे उपजिल्हा रुग्णालय केज येथे रक्त नमुने घेऊन त्याची वैद्यकीय तपासणी केली असता दि. २० रोजी प्राप्त झाला. त्या अहवालानुसार ते नशेच्या अमंलाखाली असल्याचा अहवाल प्राप्त झाला. त्या नुसार सय्यद यांनी केज पोलिस ठाण्यात शंकर ठोंबरे यांच्या विरुद्ध दिलेल्या तक्रारी नुसार त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाचे कलम ८५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस हेडकॉन्स्टेबल त्रिंबक सोपने हे पुढील तपास करीत आहेत.