Beed News : जि.प., पं.स.चे प्रारूप गट, गण जाहीर

झेडपीत आता ६१ सदस्य असणार; हरकती, सूचना लेखी स्वरूपात पुढील ७ दिवसांत सादर कराव्यात
Beed News
Beed News : जि.प., पं.स.चे प्रारूप गट, गण जाहीरFile Photo
Published on
Updated on

Beed News ZP, Panchayat Samiti Group, Gana declared

बीड, पुढारी वृत्तसेवा : येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकांसाठी बीड जिल्हा परिषदेसाठी प्रारूप विभाग रचना निश्चित करणारे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जाहीर करण्यात आले आहेत. महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम, १९६१ मधील तरतुदीनुसार या प्रारूप विभाग रचनेची अंमलबजावणी होणार आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ६० जिल्हा परिषद सदस्य होते. मात्र नवीन प्रारूप विभाग रचनेनुसार एक गट वाढल्याने आता जिल्हा परिषद सदस्य संख्या ६१ वर गेली आहे. हा येवता गट केज तालुक्यात वाढला आहे.

Beed News
Parli Vaijnath : सरपंचाच्या राजीनाम्यासाठी घरावर तुफान दगडफेक

जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी निर्गमित केलेल्या आदेशानुसार, बीड जिल्हा परिषदेच्या निवडणूक अनुषंगाने विभागीय संरचना निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील विभागांची एकूण संख्या आणि त्याचे क्षेत्र हे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच या आदे शानुसार, नागरिकांनी हरकती/सूचना लेखी स्वरूपात पुढील ७ दिवसांत (२१ जुलै २०२५ पर्यंत) जिल्हाधिकारी कार्यालयात सादर कराव्यात, असेही नमूद करण्यात आले आहे. या आदेशात नमूद केल्यानुसार जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्याकडे जिल्हा परिषदेच्या प्रारूप विभाग रचनेविषयी हरकती नोंदविता येतील. यासाठी संबंधितांनी पुरावे व आवश्यक दस्तऐवजांसह आपली भूमिका सादर करावी, असे आवाहन करण्यात आली आहे.

बीड जिल्ह्यातील असे असणार ६१ गट

गेवराई (गट ९) रेवकी, तलवाडा, जातेगाव, गढी, धोंडराई, उमापूर, चकलांबा, मादळमोही, पाडळसिंगी, माजलगाव (गट ६) केसापुरी, गंगामसला, टाकरवण, तालखेड, पात्रुड, दिंद्रुड वडवणी (गट २) उपळी, चिखलबीड बीड (गट ८)-नवगण राजुरी, बहिरवाडी, पिंपळनेर, नाळवंडी, पाली, नेकनूर, लिंबागणेश, चौसाळा शिरूर कासार (गट ४)

Beed News
Beed News : खोटी तक्रार देणे पडले महागात; केज पोलिसांनी केला गुन्हा दाखल

घाटशिळ पारगाव, रायमोहा, पाडळी, पिंपळनेर पाटोदा (गट ३) डोंगरकिन्ही, अंमळनेर, पारगाव घुमरा आष्टी (गट ७) दौलावडगाव, धामणगाव, धानोरा, लोणी (स.), कडा, मुर्शदपुर, आष्टा (ह.ना.) केज (गट ७) -विडा, येवता, आडस, होळ, चिंचोलीमाळी, नांदुरघाट, युसुफवडगाव धारूर (गट ३) -तेलगाव, भोगलवाडी, आसरडोह परळी (गट ६) सिरसाळा, पिंपरी बु., मांडवा (परळी), मोहा, जिरेवाडी, धर्मापुरी अंबाजोगाई (गट ६) जोगाईवाडी, घाटनांदूर, पट्टीवडगाव, बर्दापूर, चनई, पाटोदा म.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news