Beed News | संतोष देशमूख खून प्रकरणातील आरोपीचे आक्षेपार्ह वर्तन

धनंजय देशमुख यांचा आरोप; व्हीसीद्वारे कोर्टात हजर असतांना घडलेला प्रकार
Santosh Deshmukh Murder Case
संतोष देशमुख हत्या प्रकरण.(Pudhari photo)
Published on
Updated on

बीड : संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी गुरुवारी बीड येथील विशेष मकोका न्यायालयात झाली. यावेळी सर्व आरोपी कारागृहातून व्हीसीद्वारे सुनावणीला उपस्थित होते. सुनावणी सुरु होताच आरोपींपैकी सुदर्शन घुले याने कॉलर उडवत आक्षेपार्ह वर्तन केल्याचा आरोपी धनंजय देशमुख यांनी केला आहे. दरम्यान, गुरुवारी झालेल्या सुनावणीत जयराम चाटे याने जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे तसेच घटनास्थळ पंचनामा व्हीडीओ देण्याची मागणी आरोपीच्या वकिलांनी केली.

केज तालुक्यातील मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी गुरुवारी विशेष मकोका न्यायालयात झाली. न्या.पाटोदकर यांची प्रशासकीय बदली झाल्याची माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली होती. गुरुवारची सुनावणी मात्र न्या.पाटोदकर यांच्यासमोरच झाली. यावेळी सर्व आरोपी व्हीसीद्वारे उपस्थित होते.

ओळख परेड झाल्यानंतर सुदर्शन घुले याने कॉलर उडवत आक्षेपार्ह वर्तन केल्याचा आरोप धनंजय देशमुख यांनी माध्यमांशी बोलतांना केला. धनंजय देशमुख म्हणाले की, आरोपीची आजची जी वर्तणुक होती ती आक्षेपार्ह होती. त्यांचे जे राजकीय पाठीराखे आहेत, ते खरे आरोपी आहेत. आरोपीने जे काही केले ते कोर्टाने पाहिले, वकिलांनी पाहिले आहे. या आरोपींच्या चेहऱ्यावर कोणताही पश्चाताप नव्हता, परंतु आरोपींना शिक्षा होईल तेव्हाच त्यांनी केलेल्या कृत्याची त्यांना जाण होईल असेही धनंजय देशमुख यांनी म्हटले आहे. आता या प्रकरणातील न्यायाधीशांची बदली झाली आहे, नवे जे न्यायाधीश येतील, ते सुद्धा आम्हाला न्याय देतील असा विश्वास धनंजय देशमुख यांनी व्यक्त केला.

दरम्यान, गुरुवारी झालेल्या सुनावणीत आरोपी जयराम चाटे याने जामीनासाठी अर्ज दाखल केला. त्यावर सरकारी पक्षाच्या वतीने म्हणणे सादर करण्यात आले आहे. तसेच विष्णु चाटेकडून देखील पॉवर ऑफ ॲटर्नीची मागणी करण्यात आली आहे. जे पुरावे पेनड्राईव्हमध्ये दिले आहेत तेच लॅपटॉपमध्ये आहेत का, याबाबत कोर्टाने लेखी म्हणणे घ्यावे असे देखील आरोपींच्या वकिलांनी सांगितले. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 4 जून रोजी होणार आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news