Beed News | श्रीक्षेत्र गहिनीनाथ गड ते पंढरपूर पालखी मार्गाच्या विकासप्रश्नी आमदार धस यांच्या निवासस्थानी महत्वपूर्ण बैठक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे या प्रकल्पाला गती : आमदार सुरेश धस यांची माहिती
Beed News
Beed News |श्रीक्षेत्र गहिनीनाथ गड ते पंढरपूर पालखी मार्गाच्या विकासप्रश्नी आमदार धस यांच्या निवासस्थानी महत्वपूर्ण बैठक
Published on
Updated on

आष्टी - वारकरी संप्रदायासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या श्रीक्षेत्र गहिनीनाथ गड ते पंढरपूर पालखी मार्गाच्या विकासासाठी बुधवारी आष्टी येथे महत्वपूर्ण बैठक पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली या मार्गाच्या विकासासाठी आवश्यक प्रक्रिया गतीने सुरू करण्यात आल्याची माहिती यावेळी आ.सुरेश धस यांनी दिली.

आष्टी येथील आ.सुरेश धस यांच्या अद्वैतचंद्र निवासस्थानी झालेल्या बैठकीत पालखी मार्गाचा आराखडा, रस्त्याची रुंदी, लांबी तसेच सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येणाऱ्या मार्गांचे सर्वेक्षण आणि अंतिम मार्ग निश्चितीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. श्री क्षेत्र गहिनीनाथ गडाचे महंत ह.भ.प. विठ्ठल महाराज यांनी सुचविलेल्या या पालखी मार्गामध्ये बीड, अहमदनगर, धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यातील अनेक गावांचा समावेश करण्यात आला आहे.

वारकरी भाविकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणाऱ्या या मार्गाचा दर्जेदार व गुणवत्तापूर्ण विकास व्हावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आ.सुरेश धस यांनी पत्रव्यवहार केला होता. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी तात्काळ दखल घेत संबंधित विभागाला सर्वेक्षण व आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्याचे बैठकीत सांगण्यात आले.

या प्रस्तावित पालखी मार्गात पाटोदा तालुक्यातील श्रीक्षेत्र गहिनीनाथ गड, निवडुंगा, वाहली, सावरगाव, मुगगाव, इंचरणा, केकाण वस्ती, वनवेवाडी, आष्टी तालुक्यातील मातावळी, मातकुळी, जामखेड तालुक्यातील जामवाडी, जमदरवाडी, सारोळा, खुर्दैठण, घोडेगाव, आपटी, उंडा पिंपळगाव, सटवाई जवळके, शिंदे वस्ती, परंडा तालुक्यातील चिंचपूर, मशिदीचे, पाटलाचे पांढरवाडी, शेळगाव, तांदळवाडी, देऊळगाव, डोणजे कसाबाचे, बंगालवाडी, मिरगव्हाण तसेच करमाळा तालुक्यातील हिवरे नागोबाचे, लावंडे वस्ती, सालसे, आळसुंदा, वरकुटे, रोपणे, भोगेवाडी, जवळस, अंबड शिराळाचे, विठ्ठल टोणपे वस्ती, अरण, जाधववाडी, बार्डी, मेंढापूर, पखाल, पद्मावती गणपती मार्गे पंढरपूर असा विस्तृत समावेश आहे.

या मार्गामुळे वारकरी भाविकांना सुविधा उपलब्ध होण्यासोबतच ग्रामीण भागातील दळणवळण, व्यापार आणि विकासालाही मोठी चालना मिळणार असल्याचा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला. यावेळी श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडाचे महंत ह.भ.प. विठ्ठल महाराज, सार्वजनिक बांधकाम विभाग मंडळ धाराशिवचे अधीक्षक अभियंता बंडे तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग आष्टीचे कार्यकारी अभियंता कृष्णा पानसंबळ उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news