Beed News : चिंचा खाण्याचा मोह ठरला काळ! बेपत्ता ४ वर्षीय चिमुरड्याचा विहिरीत आढळला मृतदेह

Beed News : चिंचा खाण्याचा मोह ठरला काळ! बेपत्ता ४ वर्षीय चिमुरड्याचा विहिरीत आढळला मृतदेह
Published on
Updated on

दिंद्रुड (बीड) : बीड जिल्ह्याच्या शिरसाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जवळा गावातून सोमवारी सायंकाळपासून बेपत्ता असलेल्या एका ४ वर्षीय बालकाचा मृतदेह मंगळवारी (दि. १०) सकाळी विहिरीत आढळला. असेफ समद शेख असे या दुर्दैवी बालकाचे नाव असून, फिरंगी चिंचा खाण्याच्या नादात तो विहिरीत पडला असावा, असा प्राथमिक संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

रात्रभर शोध, पण सकाळी...

मिळालेल्या माहितीनुसार, असेफ हा सोमवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास खेळता खेळता अचानक बेपत्ता झाला होता. त्याचे कुटुंबीय, ग्रामस्थ आणि पोलिसांनी रात्रभर परिसरातील पडकी घरे, शाळा आणि शिवारात त्याचा शोध घेतला, मात्र तो मिळून आला नाही. मंगळवारी सकाळी शोधमोहीम राबवत असताना, घरापासून जवळच असलेल्या सुरेश मिसाळ यांच्या शेतातील विहिरीत असेफचा मृतदेह तरंगताना आढळला.

प्रशासकीय कारवाई आणि दफनविधी

शिरसाळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गोरक्षनाथ दहिफळे, उपनिरीक्षक आनंद जाधव, सरपंच त्रिंबक साबळे आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत मृतदेह बाहेर काढण्यात आला. पोलिसांनी तातडीने मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी धारूर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवला. शवविच्छेदनानंतर मंगळवारी सायंकाळी अत्यंत शोकाकुल वातावरणात असेफवर दफनविधी करण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news