Beed News | माजलगाव धरण भरले : ३ दरवाजातून सिंधफना नदी पात्रात विसर्ग सुरु

नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे : ५९१९ क्युसेसने विसर्ग सुरु
Beed Rain News
माजलगाव धरण भरले File Photo
Published on
Updated on

माजलगाव : माजलगाव धरण पूर्ण क्षमतेने भरले अससल्याने धरणात पाण्याचा विसर्ग सुरूच असल्याने धरणातून आज रात्री १०वाजता धरणाचे तिन दरवाजे उघडण्यात आले. हे दरवाजे अर्धा मिटरने उघडले असून सिंधफनानदी पात्रात ५९१९क्युसेसने विसर्ग सुरु आहे. सिंधफना नदीच्या पाण्याची पातळी वाढणार असून नदीकाठच्या लोकांनी सतर्क रहावे असे आवाहन करण्यात आले आहे. ही माहीती कार्यकारी अभियंता जयंत इनामदार, उपविभागीय अभियंता परिमल सोनवणे व शाखा अभियंता गणेश झापुगडे यांनी दिली आहे.

माजलगाव तालुक्यातील तिन दिवस सतत पडलेल्या पावसामुळे व धरण परिसरातील पाण्याच्या आवक मुळे माजलगाव धरणाची पातळी वरचेवर वाढत गेली. आज माजलगाव धरण रात्री दहापर्यंत १००% भरत असल्याने माजलगाव धरणातील पाणी तीन दरवाजे (अर्धा मीटरने) उघडून ५९१९क्युसेसने नदी पात्रात विसर्ग सुरु केला. सिंधफनानदी पात्रात सोडलेल्या पाण्यामुळे नदीकाठी असलेल्या गावांनी सावधानता बाळगण्याचे आवाहान उपविभागीय अधिकारी गौरव इंगोले, तहसीलदार संतोष रूईकर यांनी केले असुन सिंधफनानदी काठावरील शेतकऱ्यांनी आप आपली साधन सामुग्री,गुरे जनवारे सुरक्षित ठिकाणी हलवण्यात यावे असे आवाहन केले आहे

धरण परिसरात पोलिस गस्त वाढविण्याची गरज

माजलगाव धरणातुन सिंधफनानदी पात्रात पाणी सोडल्यास नागरीक पाणी पाहाण्यासाठी धरण परिसरात गर्दी करत असतात. त्यासाठी पोलिसांनी गस्त व बॅरिकट बसवुन दक्षता घ्यावी अशीही मागणी पुढे आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news