Beed News : घोड्याचा फडशा पाडणारा बिबट्या कॅमेऱ्यात कैद ! !

वाघाच्या चर्चेला पूर्णविराम; ग्रामस्थांनी काळजी घेण्याचे आवाहन
Beed News
Beed News : घोड्याचा फडशा पाडणारा बिबट्या कॅमेऱ्यात कैद ! !file photo
Published on: 
Updated on: 

Beed News: Leopard that preyed on a horse captured on camera!

कडा, पुढारी वृत्तसेवा : आष्टी तालुक्यातील पाटसरा परिसरात घोड्यावर हल्ला करून त्याला ठार करणाऱ्या वन्यप्राण्याचे गूढ अखेर उलगडले आहे. हा हल्ला वाघाने केला की बिबट्याने, याबाबत परिसरात उलटसुलट चर्चा सुरू होती. मात्र, वनविभागाने लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात बिबट्याची छायाचित्रे स्पष्टपणे कैद झाल्याने घोड्याचा बळी घेणारा शिकारी बिबट्याच असल्याचे समोर आले आहे.

Beed News
Beed Wild Animal | आष्टी तालुक्यात वन्यप्राण्यांचा धुमाकूळ सुरूच: घोड्याचा फडशा; वनविभागाची अवघ्या अर्ध्या तासात धाव!

पाटसरा परिसरात घोडा ठार झाल्याची घटना घडल्यानंतर वनविभागाने घटनास्थळी पाहणी करून परिसरात ट्रॅप कॅमेरे लावले होते. या कॅमेऱ्यांमध्ये 10 नोव्हेंबर रोजी रात्री बिबट्याच्या हालचाली टिपल्या गेल्या. विशेष म्हणजे, घोड्याच्या मृतदेहाजवळ येऊन त्यावर ताव मारतानाची दृश्येही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत.

त्यामुळे परिसरात वाघाच्या वावराबाबत सुरू असलेल्या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. आष्टी तालुक्यात सध्या वन्यप्राण्यांचा वावर वाढल्याने शेतकरी आणि पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. पाटसरा परिसरातील या घटनेने पाळीव जनावरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. वनविभागाने लावलेल्या कॅमेऱ्यांमुळे हल्लेखोर वन्यप्राण्याची ओळख पटण्यास मदत झाली आहे.

Beed News
Beed News : श्री संत तुकोबाराय पावनधाम २१ हजार दिव्यांच्या प्रकाशात उजळले

वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल मुंडे यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. रात्रीच्या वेळी एकट्याने बाहेर पडू नये, जंगल व झाडीच्या परिसरात विनाकारण जाऊ नये, तसेच लहान मुले, वृद्ध व्यक्ती आणि पाळीव जनावरांची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन वनविभागाने केले आहे.

बिबट्याच्या बंदोबस्ताची प्रतीक्षा !

बिबट्याचा वावर कॅमेऱ्यात स्पष्ट झाल्यानंतर परिसरातील नागरिकांमध्ये काही प्रमाणात संभ्रम दूर झाला असला, तरी बिबट्याच्या संभाव्य हल्ल्याची भीती कायम आहे. त्यामुळे वनविभागाने परिसरात गस्त वाढवून नागरिक आणि पशुधनाच्या सुरक्षिततेसाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

नागरिकांनी खबरदारी घ्यावी : अमोल मुंडे

पाटसरा व परिसरातील नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगावी. व अत्यावश्यक कामाशिवाय तलाव, जंगल व झाडीच्या परिसरात जाणे टाळावे. शेतात किंवा माळरानावर एकट्याने जाणे टाळावे. लहान मुले व वृद्ध व्यक्तींवर विशेष लक्ष ठेवावे. बिबट्या किंवा अन्य वन्यप्राणी दिसल्यास त्याच्या जवळ जाण्याचा अथवा पकडण्याचा प्रयत्न करू नये. वन्यप्राणी दिसताच तातडीने वनविभागाला माहिती द्यावी. अफवांवर विश्वास ठेवू नका किंवा अफवा पसरवू नयेत. अशी आव्हान वन विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.