Kej Nagar Panchayat Scam | केज नगर पंचायतीचा घरकुल घोटाळा

गोर गरिबांच्या डोक्यावरच्या छप्परांचा निधी परस्पर करणाऱ्या तत्कालीन मुख्याधिकाऱ्यासह 6 जणांविरूद्ध फसवणुकीचा गुन्हा
scam
ScamPudhari
Published on
Updated on

गौतम बचुटे

केज: नगर पंचायतीच्या तत्कालीन मुख्याधिकारी आणि अधिकारी यांनी संगनमत करून प्रधानमंत्री आवास योजनेच्या खात्यामध्ये राज्य शासन व केंद्र शासनाचा प्राप्त निधी हा पात्र घरकुल लाभार्थ्यांच्या खात्यावर वर्ग न करता नियमबाह्य पद्धतीने ४ कोटी २४ लाख ७३ हजार रु. इतर खात्यावर वर्ग करून शासकीय रक्कमेचा अपहार केला. त्याचा पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने शासकीय दस्तऐवज गहाळ केल्या प्रकरणी मुख्याधिकारी यांच्या तक्रारी वरून तत्कालीन मुख्याधिकाऱ्यासह लेखापाल यांच्यासह सहा जणांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे केज तालुक्यात खळबळ उडाली आहे.

केज नगरपंचायत अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेच्या खात्यामध्ये राज्य शासन व केंद्र शासनाचा प्राप्त निधी हा फक्त पात्र घरकुल लाभार्थ्यांना देणे आवश्यक असताना, दि. २० मे ३०२१ ते ३१ जानेवारी २०२२ या कालावधी मध्ये एकूण रक्कम ४ कोटी २४ लाख ७३ हजार २३ रुपये तत्कालीन मुख्याधिकारी मिलींद सावंत(से. नि.) यांनी लेखापाल आणि इतरांच्या संगनमताने लाभार्थ्या व्यतिरिक्त इतर खात्यावरती वर्ग केला. तक्रारी वरून ती रक्कम वर्ग झाल्याचे निदर्शनास आल्याने त्याचा अहवाल नगरपंचायत केज यांनी जिल्हाधिकारी, बीड यांना सादर केला. जिल्हाधिकारी, बीड यांचे आदेशान्वये उपविभागीय अधिकारी दिपक वजाळे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करण्यात आली. चौकशी समितीने चौकशी करून तपासणीचा परिपूर्ण अहवाल मा. जिल्हाधिकारी यांना सादर केल्या नंतर तत्कालीन मुख्याधिकारी मिलींद सावंत(से. नि.) यांनी लेखापाल आणि इतर कर्मचारी यांनी संगणमत करून ४ कोटी २४ लाख ७३ हजार २३ रुपये शासनाचे कोणतेही निर्देश नसताना नियमबाह्य पद्धतीने इतर खात्यावर रक्कम वर्ग करून शासकीय रक्कमेचा अपहार केला. त्याचा पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने शासकीय दस्तऐवज गहाळ केले. अशी तक्रार केज नगर पंचायतीचे मुख्याधिकारी अजित गणपतराव ढोपे यांनी पोलीस स्टेशन, केज येथे दिली होती. त्याची सखोल चौकशी केल्या नंतर प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरकुल घोटाळ्याच्या आर्थीक गैरव्यवहारा बाबत तत्कालीन मुख्याधिकारी मिलींद सावंत, तत्कालीन लेखापाल असद इसाकोद्दीन खतीब, कंत्राटी लेखापाल यांचे सहायक लक्ष्मण मारोती जगताप (से.नि.) आणि व्हॉल्वमन भास्कर एकनाथ ससाणे, भीमराव शामराव मस्के, बासेद वलीयोद्दीन काझी या सहा जणांच्या विरुद्ध गु.र.नं.२३६/२०२६, भा. दं. वि. ४०९, ४२०, २०१, २०४, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

____________

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news