Beed News : केज परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करुन अवैध वाहतूक!

प्रशासकीय यंत्रणेचे होतेय दुर्लक्ष
वृक्षतोड करुन रस्त्‍यालगत असे तोडलेल्या झांडाचा ढीग टाकले आहेत
वृक्षतोड करुन रस्त्‍यालगत असे तोडलेल्या झांडाचा ढीग टाकले आहेत
Published on: 
Updated on: 

केज:- केज तालुक्यातील अनेक गावात वृक्ष तोड मोठ्या प्रमाणात सुरू असून त्याची अवैध्य वाहतूक देखील सुरू आहे. मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होऊन जंगल क्षेत्र कमी झाल्याने पर्जन्यमान कमी होत असल्याने अवर्षण आणि दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे. या वृक्षतोडीवर कोणाचाच लगाम नसल्याचे दिसत आहे. संबधित खात्‍याचे अधिकारी याकडे कानाडोळा करत असल्याचे दिसून येत आहे.

अन्नधान्य उत्पन्नात घट झाल्याने शेतकरी आत्महत्या होत आहेत तसेच पशुधन कमी झाले आहे. त्यातच केज तालुका आणि परिसरातील अनेक भागात शेतातील वृक्षांची मोठ्या प्रमाणात वृक्षतोड सुरू आहे. वृक्ष तोड झाल्या नंतर त्याची आरा मशीन पर्यंत त्याची अवैध वाहतूक सुरू आहे. मात्र यावर प्रशासकीय यंत्रणेचा कुठलाच अंकुश राहिलेला नाही. परिसरातील अवैध वृक्ष रोखण्याची मागणी वृक्ष प्रेमी कडून होत आहे.

"सुबाभूळ आणि निलगिरी वृक्ष याची शेतकरी वृक्ष तोड करता येते. त्यासाठी परवानगी आवश्यकता नाही. त्‍यामुळे झालेली ही वृक्षतोड या झाडांची आहे‘

- ईश्वर गुणावत, वन परिक्षेत्र अधिकारी, धारूर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news