Beed News : डोणगाव शिवारात कपाशीच्या शेतात कोळपणीच्या कामाला आला वेग

उगवलेल्या पिकांमध्ये आंतरमशागतीचे काम सुरू, मजूर मिळेना
Beed News
Beed News : डोणगाव शिवारात कपाशीच्या शेतात कोळपणीच्या कामाला आला वेगfile photo
Published on
Updated on

Beed News : In Dongaon Shivara, the work of cotton in the cotton fields has gained momentum

डोणगाव, पुढारी वृत्तसेवा : जाफराबाद तालुक्यातील डोणगावसह परिसरामध्ये पावसाने जून महिन्याच्या शेवटी रिमझिम पावसाने हजेरी लावल्याने धूळपेरणी करण्यात आली होती. यानंतर पाऊस पडल्याने कपाशी उगवून आली आहे. उगवलेल्या पिकांमध्ये आंतरमशागतीचे कामे सुरू झाली आहे.

Beed News
Jalna News : रिमझिम पावसाने शेत शिवार गजबजले

डोणगाव शिवारात पावसाच्या वातावरणामुळे शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील कोळपणी, खुरपणी, रासायनिक खते देणे आणि औषध फवारणी यांसारख्या अंतर्गत मशागतींच्या कामांना वेग दिला आहे. रिमझिम पावसाने पिकांना जीवदान दिल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे.

मागील आठवड्यापासून रिमझिम पाऊस असल्याने खरिप हंगामातील पिकांना संजीवनी मिळाली आहे. पिकामध्ये आंतरमशागतीच्या कामाला शेतकरी यांनी सुरुवात केली आहे. बैलजोडीच्या सहाय्याने कपासीच्या शेतात कोळपणीचे कामे करण्यात येत आहे.

Beed News
Beed news | रेंगाळलेल्या रस्ता कामाची धूळ शेतात, पिकांची वाढच खुटंली, शेतकऱ्याने संतापून मिरची - पपईची झाडे उपटून टाकली!

काही शेतकरी मजुराच्या सहाय्याने खुरपणी करताना दिसत आहे. शेतकऱ्यांना शेती खर्च करून स्वतःचा घरचा खर्च, शिक्षणाकरिता लागणारा खर्च, शेतीत बी बियाणे पासून रासायनिक खते कीटकनाशक औषध फवारणी खर्च नसल्याचे शेतकरी सांगत आहे. परवडत

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news