

दिंद्रुड : लोखंडी विद्युत खांबाला करंट उतरल्याने शेळीपालन करणाऱ्या अत्यल्पभूधारक शेतकऱ्याचा बकरा चिटकून ठार झाल्याची घटना काल शनिवारी (दि.०४) सकाळी अकरा वाजता च्या सुमारास दिंद्रुड गावात घडली. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ खांब काढण्याची प्रक्रिया पूर्ण केली. पशुवैद्यकीय कर्मचाऱ्यांनी मयत बकऱ्याचा पंचनामा केला.
माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड येथील शेतकरी अशोक मारुती तांबे हे शेळीपालन करतात. शनिवारी सकाळी रोजच्या प्रमाणे शेळ्या चारण्यासाठी जात असताना येथील करंट उतरलेल्या एका लोखंडी खांबात बेण्याला राखलेला अंदाजे वीस हजार रुपये किंमतीचा बकरा चिटकुन जागीच ठार झाला. स्थानिकांनी विद्युत कार्यालयास माहिती दिल्यानंतर वीज पुरवठा तात्काळ बंद करत महावितरण व पशुवैद्यकीय कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करत बकरा मालकास महावितरण द्वारे भरपाई देण्याचे आश्वासन दिले.