Beed News | केज तालुक्यातील शिंदी येथे कुत्र्याच्या हल्ल्यात हरीण जखमी!

गोविंद पाटील आणि सय्यद मौनिद्धीन यांनी जखमी हरणाची सुश्रुषा करून वाचविले प्राण
Beed News | केज तालुक्यातील शिंदी येथे कुत्र्याच्या हल्ल्यात हरीण जखमी!
Beed News | केज तालुक्यातील शिंदी येथे कुत्र्याच्या हल्ल्यात हरीण जखमी!
Published on
Updated on

केज :- केज तालुक्यातील शिंदी येथे कुत्र्यांच्या हल्ल्यात शेतात जखमी अवस्थेत असलेल्या एका गाभण हरिणीला कुत्र्याच्या तावडीतून सुटका करीत जखमी हरणावर उपचार करून वनविभाग आणि पोलिसांशी संपर्क साधून प्राण वाचविले आहेत.

दि. १७ जून रोजी केज तालुक्यातील शिंदी येथील शिवारात कुत्र्यांनी पाठलाग करून एका गाभण हरिणीच्या पायाला चावा घेऊन गंभीर जखमी केले होते. हे पहिल्या नंतर शेतात काम करीत असलेले मैनुद्दीन सय्यद यांनी जखमी हरिणीची कुत्र्याच्या तावडीतून सुटका केली आणि रात्री तिला घरी घेऊन येत गोविंद पाटील आणि त्यांनी हरिणीच्या जखमेवर खाजगी उपचार करून सुश्रुषा केली. त्या नंतर त्यांनी केज पोलिस ठाण्याच्या डीएसबी विभागाचे शिवाजी कागदे आणि वनविभाग धारूरचे वन सेवक संभाजी पारवे व शाम गायसमुद्रे यांच्याशी संपर्क साधला.

वनविभागाचे शाम गायसमुद्रे, गोके यांनी गोविंद पाटील यांच्या ताब्यातील जखमी हरिणावर उपचार करण्यासाठी त्याला ताब्यात घेऊन उपचार करण्यासाठी पशु वैद्यकीय अधिकाऱ्याकडे घेऊन गेले. जखमी हरिणाची मैनुद्दीन सय्यद व गोविंद पाटील यांनी सुश्रुषा केल्या बद्दल आणि त्याला सुखरूप वनविभागाच्या ताब्यात देण्याच्या त्यांच्या कामगिरी बद्दल त्यांचे कौतुक होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news