

Kej police station protest
केज: तालुक्यातील नांदुरघाट येथे १५ नोव्हेंबर रोजी झालेल्या अपघातात संतोष राजा काळे (वय ३८) आणि त्यांचा मुलगा विशाल संतोष काळे गंभीर जखमी झाले होते. अपघातात संतोष काळे यांचा रस्त्यातच मृत्यू झाला, तर त्यांच्या मुलावर अद्याप उपचार सुरु आहेत. दरम्यान, नातेवाईकांनी मृतदेह केज पोलीस ठाण्यात आणून ठिय्या दिला. अखेर त्यांची समजूत काढल्यानंतर मृतदेह कळंबकडे नेण्यात आला.
संतप्त नातेवाईकांनी १६ नोव्हेंबर रोजी दुपारी सुमारास मृतदेह केज पोलिस ठाण्यात आणून ठिय्या दिला. पोलिस अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या मध्यस्थीने नातेवाईकांची समजूत करून मृतदेह अंत्यविधीसाठी कळंबकडे रवाना करण्यात आला. पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे, पोलिस निरीक्षक इनामदार सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश क्षीरसागर, सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप मांजरमे, पोलिस उपनिरीक्षक उमेश निकम, तसेच पारधी समाजाचे कार्यकर्ते खंडू काळे आणि बारीकराव काळे, प्रा. हनुमंत भोसले, यांनी मध्यस्थी केली.
अपघातात बाळू गवळी आणि बापूराव गवळी यांनी मद्याच्या नशेत कार चालवून मोटारसायकलीला धडक दिली होती. संतोष काळे यांचे वडील राजा काळे यांच्या तक्रारीवरून केज पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिस हेड कॉन्स्टेबल राजू वंजारे, सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करत आहेत.