Parli Crime | परळीत अल्पवयीन मुलीचा विनयभंग; "भेटायला नाही आलीस तर..." म्हणत जीवे मारण्याची धमकी

परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात एका युवकाविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा
Minor Girl Molestation
Minor Girl MolestationPudhari
Published on
Updated on

Parli Minor Girl Molestation

परळी वैजनाथ : "मला भेटायला ये, नाही आलीस तर तुझा वाईट हाल करेन," अशी धमकी देत एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. मुलगी घरात एकटी असल्याचा गैरफायदा घेत आरोपीने हे कृत्य केले. याप्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात एका युवकाविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घरात एकटी पाहून गैरवर्तन

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मिरवट (ता. परळी) येथील एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला लक्ष्य करण्यात आले. आरोपी आरमान मुबारक शेख (रा. मिरवट, ता. परळी) याने पीडित मुलगी घरी एकटी असताना तिथे प्रवेश केला. "तू मला रात्री खंडोबा मंदिराजवळ भेटायला ये, नाही आलीस तर तुझा वाईट हाल करेन," अशी धमकी त्याने मुलीला दिली. एवढ्यावरच न थांबता आरोपीने पीडितेचा हात धरून तिला जवळ ओढले व तिच्या मनास लज्जा वाटेल असे कृत्य केले.

Minor Girl Molestation
Beed Crime | राजकारण लय वंगाळ गड्या..!; गावाच्या राजकारणावरून स्मशानभूमीतच हाणामारी, एकजण जखमी

गुन्हा दाखल, पोलिसांचा तपास सुरू

या धक्कादायक प्रकारानंतर पीडितेच्या तक्रारीवरून आरोपी आरमान शेख याच्याविरुद्ध धमकी देणे आणि विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निमोणे करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news