

गौतम बचुटे/केज :- बीड आणि धाराशिव जिल्ह्याला जोडणारा मांजरा नदी पुला वरच्या रस्ता दुरुस्तीसाठी संघर्ष समितीच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी बीड जिल्ह्याचे खा. बजरंग सोनवणे रस्त्यावर उतरले. तसेच रस्ता रोको संपल्या नंतर रस्त्यावरची वाहतूक सुरळीत करण्यासाठी त्यांनी रस्त्यावर उतरून स्वत: वाहतूक सुरळीत केली.
याबाबतची माहिती अशी की, दि. २८ जानेवारी रोजी बीड आणि धाराशिव जिल्ह्यातील केज-कळंब दरम्यान असलेल्या मांजरा पुलावरील रस्ता दुरुस्त करण्या संदर्भात केज संघर्ष समितीचे प्रा. हनुमंत भोसले सर, संपत वाघमारे, तात्या गवळी, मुबशिर खतीब, नासीर मुंडे, गौतम बचुटे आणि कार्यकर्ते यांनी केज येथे मांजरा पुलाव रस्ता रोको आंदोलन. यावेळी एका कार्यक्रमासाठी जात असलेले खा. बजरंग सोनवणे हे जात असताना त्यांनी आंदोलन आणि अधिकारी यांची भेट घेऊन त्यांना रस्ता दुरुस्ती करण्यासंदर्भात सूचना दिल्या. तसेच केज आणि कळंबच्या दोन्ही तहसीलदारांना त्यांनी याबाबत धारेवर धरले.