Beed News | थकीत पैसे मिळत नसल्याने माजलगावात व्यक्तीचा विष प्राशनाचा प्रयत्न; खरेदी-विक्री संघाच्या माजी अध्यक्षाच्या घरासमोर प्रकार

प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगरला हलविले
Majalgaon Financial Dispute
नवनाथ पवार यांनी विष प्राशन केल्याचे लक्षात येताच परिसरात एकच गोंधळ उडाला Pudhari
Published on
Updated on

Majalgaon Financial Dispute

माजलगाव: आर्थिक व्यवहारातील लाखो रुपयांची थकीत रक्कम परत मिळत नसल्याचा आरोप करत एका व्यक्तीने विष पिऊन जीवन संपविण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नवनाथ गणपत पवार (रा. वारोळा, ता. माजलगाव) असे या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकारामुळे माजलगाव शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

माजी अध्यक्षांच्या घरासमोर टोकाचे पाऊल मिळालेल्या माहितीनुसार, माजलगाव तालुका खरेदी-विक्री संघाचे माजी अध्यक्ष दीपक जगन्नाथ जाधव (छत्र बोरगावकर) यांच्या स्वामी विवेकानंद नगर येथील निवासस्थानासमोर ही घटना घडली. शुक्रवारी (दि. १०) सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास नवनाथ पवार यांनी जाधव यांच्या घरासमोर जाऊन विषारी औषध प्राशन केले.

Majalgaon Financial Dispute
Beed News : महाबीजच्या बियाण्याने शेतकऱ्यांचा घात; उगवण झाली नाही अन् दुबार पेरणीतही निघाले सडलेले बियाणे

उपचारासाठी संभाजीनगरला हलवले विष प्राशन केल्याचे लक्षात येताच परिसरात एकच गोंधळ उडाला. नवनाथ पवार यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने, त्यांना तातडीने पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या घटनेचा पुढील तपास स्थानिक पोलीस करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, नवनाथ पवार यांनी अनेक वर्षांच्या मैत्री व विश्वासाच्या नात्यामुळे दीपक जाधव यांना मोठी आर्थिक मदत केल्याचा दावा केला आहे. मात्र वारंवार मागणी करूनही संबंधित रक्कम परत मिळाली नसल्याने न्याय मिळावा, या मागणीसाठी त्यांनी १५ जूनपासून आपल्या कुटुंबासह जाधव यांच्या घरासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले होते.

यावेळी काही लोकांनी मध्यस्थी करून प्रकरण मिटवले होते. परंतु तरीही जाधव हे पैसे देत नसल्याने शुक्रवारी जाधव यांच्या निवासस्थानासमोर सकाळी नवनाथ पवार यांनी कुटुंबीयांसमवेत येऊन विषारी औषध प्राशन केल्याचे सांगण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

Majalgaon Financial Dispute
Beed Crime | खळबळजनक : बँकेतून दीड लाखाची रक्कम काढताच, महिलेचे रिक्षातून केले अपहरण!

मात्र पवार यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यास त्यांच्या कुटुंबीयांनी तीव्र विरोध केला. "आमची थकीत रक्कम मिळावी, अन्यथा आमचा माणूस मेला तरी हरकत नाही," अशी आक्रमक भूमिका कुटुंबीयांनी घेतल्याने काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. सुमारे पाऊण तास चाललेल्या गोंधळानंतर महिला पोलिसांच्या उपस्थितीत पोलिसांनी नवनाथ पवार यांना ताब्यात घेऊन बळजबरीने रुग्णवाहिकेतून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

या घटनेमुळे माजलगाव शहरात मोठी खळबळ उडाली असून आर्थिक व्यवहाराच्या वादातून एवढे टोकाचे पाऊल उचलले गेल्याने विविध स्तरांतून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news