Majalgaon Tower Protest | माजलगावात जात प्रमाणपत्रासाठी तरुणाचे टॉवरवर चढून ‘शोले स्टाईल’ आंदोलन; प्रशासनाची धावपळ

या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलीस व महसूल प्रशासनाची धावपळ
youth climbed a mobile tower Majalgaon
youth climbed a mobile tower MajalgaonPudhari
Published on
Updated on

youth climbed a mobile tower Majalgaon

माजलगाव : जात प्रमाणपत्र मिळत नसल्याच्या निषेधार्थ एका तरुणाने माजलगाव शहरात मोबाईल कंपनीच्या टॉवरवर चढून ‘शोले स्टाईल’ आंदोलन सुरू केल्याची घटना मंगळवारी (दि.१०) घडली. या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलीस व महसूल प्रशासनाची धावपळ उडाली.

धारूर तालुक्यातील धुनकवड येथील हानुमंत जमादार (वय ३२) हा महादेव कोळी समाजाचा तरुण असून जात प्रमाणपत्र मिळावे, या मागणीसाठी तो माजलगाव शहरातील सन्मित्र कॉलनी परिसरातील मोबाईल कंपनीच्या टॉवरवर चढला. टॉवरच्या उंच भागावर बसून त्याने प्रशासनाविरोधात तीव्र भूमिका घेतली. “जोपर्यंत मला जात प्रमाणपत्र दिले जात नाही, तोपर्यंत मी खाली उतरणार नाही,” असा पवित्रा आंदोलनकर्त्याने घेतला.

youth climbed a mobile tower Majalgaon
Beed News | आजारपणाला कंटाळून वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापकाने जीवन संपविले

तसेच कोणी जबरदस्तीने खाली आणण्याचा प्रयत्न केल्यास किंवा जवळ येण्याचा प्रयत्न केल्यास टॉवरवरून उडी मारून आत्महत्या करीन, अशी धमकी त्याने दिल्याने प्रशासनाची चिंता वाढली. घटनेची माहिती मिळताच माजलगाव शहर पोलीस ठाण्याचे जमादार बंडाने, पोलीस कर्मचारी महेश चव्हाण, असलम शेख यांच्यासह पोलीस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तसेच महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारीही घटनास्थळी पोहोचले.

आंदोलनकर्त्याला समजावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, टॉवरवर चढलेल्या तरुणामुळे परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांकडून खबरदारी घेतली जात आहे. प्रशासनाकडून आंदोलनकर्त्याशी संवाद साधून त्याला सुरक्षितपणे खाली उतरवण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेमुळे जात प्रमाणपत्राच्या प्रशासकीय प्रक्रियेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून संबंधित मागणीची तातडीने दखल घेण्याची मागणी स्थानिकांकडून व्यक्त होत आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news