Farmers Protest Kej | कोरडेवाडी ग्रामस्थांनी मोर्चा काढून केज तहसील कार्यालयासमोर बैलगाडी पेटविली

Beed News | राजश्री राठोड यांच्या उपोषणाकडे दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थ संतप्त
Kordewadi protest
कोरडेवाडी ग्रामस्थांनी मोर्चा काढून केज तहसील कार्यालयासमोर बैलगाडी पेटवून दिली(Pudhari Photo)
Published on
Updated on

Kej tehsil office burn bullock cart

केज : बीड जिल्ह्यातील कोरडेवाडी (ता. केज) येथे सहा दिवसांपासून धर्मवीर संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानच्या राजश्री राठोड या उपोषणाला बसल्या आहेत. त्यांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस असून त्यांच्या उपोषण आणि मागणीकडे दुर्लक्ष होत आहे.

त्यामुळे संतप्त गावकऱ्यांनी बाळराजे आवारे पाटील यांच्या नेतृत्वाखाली केज तहसील कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढून तहसील कार्यालयाच्या आवारात बैलगाडीवर पेट्रोल टाकून पेटवून दिली. आंदोलकांनी कोरडेवाडी येथील साठवण तलाव मंजूर करावा. ज्ञानराधा बँकेच्या ठेवी परत देण्यात याव्या. तसेच राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा आणि प्रति हेक्टरी 50 हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी, अशा मागण्यां केल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news