

Kej Stone Pelting on Buses
गौतम बचुटे
केज : साठवण तलाव आणि इतर मागण्यांसाठी सलग बारा दिवसांपासून सुरू असलेल्या आमरण उपोषणाची सरकार दाखल घेत नसल्याने संतप्त आंदोलक रस्त्यावर उतरले. केज येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात पाच तासांपासून रस्ता रोको आंदोलन सुरू आहे. दरम्यान पाच तास उलटून गेल्या नंतरही कुठला तोडगा निघत नसल्याने अज्ञातांनी पाच बसेसवर दगडफेक करून नुकसान केले आहे. त्यामुळे दोन्ही महामार्गावरील वाहतूक पूर्णतः विस्कळीत झाली असून महामार्गावर सुमारे तीन किमीच्या रांगा लागल्या आहेत.
धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठान वतीने कोरडेवाडी येथे राजश्रीताई उमरे पाटील या बीड जिल्ह्यातील कोरडेवाडी तालुका केज येथे साठवण तलावाच्या साठी पाणी उपलब्ध असल्याचे प्रमाणपत्र द्यावे. अतिवृष्टीने पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ५० हजार नुकसान भरपाई देण्यात यावी. ज्ञानराधा बँकेची स्थावर व जंगम मालमत्ता ताब्यात घेऊन त्याचा लिलाव करण्यात यावा. त्यातून मिळालेल्या उत्पन्नातून ठेवीदारांचे पैसे तातडीने परत करण्यात यावेत. शेतकरी कर्जमाफी करण्यात यावी. शैक्षिणिक फीस माफ करण्यात यावी. या त्यांच्या पाच प्रमुख मागण्या साठी दि. ३ ऑक्टोबर पासून कोरडेवाडी येथे आमरण उपोषणाला बसल्या आहेत.
आज त्यांच्या उपोषणाचा बारावा दिवस आहे. मात्र त्यांच्या उपोषणाची प्रशासनाने दखल घेतली नसल्याने दि. ८ ऑक्टोबर रोजी संतप्त आंदोलकांनी तहसील कार्यालया समोर पेट्रोल टाकून बैलगाडी पेटविली. तसेच दि. ११ ऑक्टोबर रोजी सुमारे शंभर आंदोलकांनी तलावात उतरून जलसमाधी आंदोलन केले. मात्र, त्याही नंतर सरकार आणि प्रशासनाचे लक्ष न दिल्यामुळे आज (दि. १४) धर्मवीर छत्रपती संभाजी राजे शौर्य प्रतिष्ठानचे कार्यकर्ते आणि गांवकरी यांनी केज येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या जवळ कळंब चौकात रास्ता रोको आंदोलन केले आहे.
सकाळी ११ वाजता सुरू झालेले हे आंदोलन दुपारी ४:३० वाजून गेले तरी रस्ता रोको आंदोलन सुरू असल्याने बीड - अंबाजोगाई, केज- माजलगाव आणि केज- कळंब या महामार्गावरील वाहतूक खोळंबली असल्याने शहराच्या वाहनांच्या बाहेर लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत. तर उभ्या असलेल्या पाच एसटी बसेसवर अज्ञातांनी दगडफेक करून आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे.
१) दि. ३ ऑक्टोबर २०२५ -- साठवण तलाव, ज्ञानाराधा बँकेच्या ठेवी, दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ५० हजार रु नुकसान भरपाई यासह विविध मागण्यासाठी कोरडेवाडी येथे सहा दिवसा पासून उपोषण सुरू
२) दि. ८ ऑक्टोबर २०२५ - संतप्त आंदोलकांनी तहसील कार्यालया समोर पेट्रोल टाकून बैलगाडी पेटविली.
३) दि. ११ ऑक्टोबर - सुमारे शंभर आंदोलकांनी तलावात उतरून जलसमाधी आंदोलन केले.
४) दि. ११ ऑक्टोबर :- सकाळी ११:०० वाजे पासून केज येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ रस्ता रोको आंदोलन सुरू आहे.
त्यानंतर आंदोलनाला हिंसक वळण लागले असून आंदोलकांनी पाच बसेसवर दगडफेक केली आहे. यात बसेसचे मोठे नुकसान झाले आहे.
१) उदगीर - गंगापूर
२)अहमदपूर - चाळीसगाव
३) गंगाखेड - आळंदी
४) लातूर - पाटोदा
५) एम एच २०/बी एल २१०८