Beed Crime | केज तालुक्यात शेतमजुरीस जात असलेल्या महिलेचा विनयभंग; तोंडाचा चावा घेऊन केली सुटका

Kej Crime | आरोपीविरुद्ध विनयभंगासह ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Woman Harassment Case
Woman Harassment CasePudhari
Published on
Updated on

Kej Woman Harassment Case

केज : केज तालुक्यात ऊस बांधणीसाठी शेतात मजुरी करण्यास जात असलेल्या एका विवाहित महिलेचा रस्त्यात अडवून वाईट हेतूने गैरवर्तन करत विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मात्र प्रसंगावधान राखत पीडित महिलेने धाडसी प्रतिकार करत आरोपीच्या तोंडाला चावा घेतला, त्यामुळे आरोपीने पळ काढला. या प्रकरणी आरोपीविरुद्ध विनयभंगासह ॲट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना ६ फेब्रुवारी रोजी सकाळी सुमारे ८.१५ वाजताच्या सुमारास घडली. केज तालुक्यातील ही महिला रोजंदारीने ऊस बांधणीचे काम करण्यासाठी एकटीच पायी शेताकडे जात असताना आरोपीने तिला रस्त्यात अडवले. त्यानंतर झटापट करत वाईट हेतूने तिच्याशी गैरवर्तन करून तिचा विनयभंग केला. आरोपीच्या तावडीतून सुटण्यासाठी महिलेने त्याच्या तोंडाला जोरदार चावा घेतला. त्यामुळे जखमी झालेल्या आरोपीने तिला सोडून घटनास्थळावरून पळ काढला.

Woman Harassment Case
Beed Crime | टाकळी अमिया येथे दिवसाढवळ्या अवैध वाळू उपसा; तलाठ्यांच्या अर्थपूर्ण दुर्लक्षामुळे माफियांचे फावले

या घटनेनंतर पीडित महिलेने तात्काळ आपल्या दीर, जाऊ व सासू यांना संपूर्ण प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर कुटुंबीयांसह केज पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल करण्यात आली. या तक्रारीवरून अजहर अशरफ पठाण याच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर ५७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ७४, ११५(२) तसेच ॲट्रॉसिटी कायद्यानुसार कलम ३(१)(आर), ३(१)(डब्ल्यू)(i) व ३(१)(डब्ल्यू)(ii) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक व्यंकटराम हे करीत आहेत.

धाडसी प्रतिकारामुळे आरोपी जखमी

पीडित महिलेने प्रसंगावधान राखत केलेल्या प्रतिकारात आरोपीच्या तोंडाला जोरदार चावा घेतल्याने तो जखमी झाला आहे. या घटनेनंतर आरोपीची परिसरात चांगलीच चर्चा होत असून त्याच्या कृत्याचा सर्वत्र निषेध व्यक्त केला जात आहे.

Woman Harassment Case
Beed Crime | पतीकडून इच्छेविरुद्ध अनैसर्गिक कृत्य व छळ; सासरच्या सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

पीडित महिलेचा पती दोन वर्षांपासून बेपत्ता

पीडित महिलेचा पती मागील दोन वर्षांपासून बेपत्ता असून याबाबत पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आलेली आहे. अद्याप त्याचा शोध लागलेला नाही. आरोपीने महिलेच्या या परिस्थितीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केल्याचेही प्राथमिक तपासात समोर आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news