Kej Bribe | केजमध्ये ग्राम महसूल अधिकारी 'लाचलुचपत'च्या जाळ्यात; वारस फेरफारसाठी 39 हजार लाचेची मागणी

पिराची वाडी येथील एका शेतकऱ्याकडून वारसाचा फेर घेण्यासाठी ३९ हजार रुपयांची लाच
 Crime
Bribe CasePudhari
Published on
Updated on

Kej Revenue Officer bribery

केज : तालुक्यातील दहिफळ वडमाउली येथे ग्राम महसूल अधिकाऱ्याला लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. वारस नोंद फेरफारसाठी तब्बल ३९ हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोप असून तडजोडीनंतर ३५ हजारांवर व्यवहार ठरला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, परमेश्वर राऊत (ग्राम महसूल अधिकारी) यांनी पिराची वाडी येथील एका शेतकऱ्याकडून वारसाचा फेर घेण्यासाठी ३९ हजार रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीनंतर ही रक्कम ३५ हजारांवर ठरली. मात्र संबंधित शेतकऱ्याने लाच देण्यास नकार देत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला.

 Crime
Kej Accident | केज येथे दोन कार आणि एसटी बसचा तिहेरी अपघात!

त्याअनुसार बुधवारी (दि. ८) सापळा रचण्यात आला. दहिफळ वडमाउली येथे लाच स्वीकारताना अधिकाऱ्याला रंगेहात पकडण्यात आले. या कारवाईत सहाय्यक पोलीस उपअधीक्षक सोपान चित्तमपल्ले, पोलीस निरीक्षक बीडकर, सुरवसे व पुरी यांचा सहभाग होता.

या प्रकरणामुळे महसूल विभागातील भ्रष्टाचार पुन्हा एकदा उघडकीस आला असून, पुढील तपास सुरू आहे.

संरक्षण सेवेतून निवृत्तीनंतर महसूल खात्यात रुजू

लाच घेताना पकडले गेलेले परमेश्वर राऊत हे पूर्वी संरक्षण सेवेत कार्यरत होते. निवृत्तीनंतर त्यांनी महसूल विभागात ग्राम महसूल अधिकारी म्हणून नोकरी स्वीकारली होती. मात्र, सेवेत आल्यानंतर लाचेच्या प्रकरणात अडकून त्यांची प्रतिमा मलीन झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news