Kej Police Raid | केज तालुक्यात वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश: रेणुका कला केंद्रावर पोलिसांची धाड; गुजरातमधील २ महिलांची सुटका

Beed Crime News | मॅनेजर आणि पार्टी मालकीणला पोलिसांनी घेतले ताब्यात
Kej Police Raid
प्रातिनिधिक छायाचित्र Pudhari Photo
Published on
Updated on

Kej Police Raid on Sex Racket

गौतम बचुटे

केज: केज तालुक्यातील सारूळ फाटा येथील रेणुका कला केंद्रावर लोकनाट्य तमाशाच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर पुन्हा एकदा पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत गुजरात राज्यातील दोन महिलांची सुटका करण्यात आली असून, केंद्राचा मालक फरार झाला आहे. मॅनेजर आणि पार्टी मालकीणला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, मंगळवारी (दि. ५) रात्री ८ वाजता बीड अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेच्या पथकाने छापा टाकला. जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या आदेशानुसार, पोलीस निरीक्षक देवीदास भागवत, उपनिरीक्षक पल्लवी जाधव, सहाय्यक उपनिरीक्षक मिरा रेडेकर आणि महिला पोलिसांसह पथकाने बनावट ग्राहक पाठवून ही कारवाई केली.

Kej Police Raid
Kej Crime News | केज बस स्थानकावर वृद्धाची फसवणूक; रुद्राक्ष देऊन सोन्याची अंगठी केली लंपास

छाप्यात गुजरातमधील ३२ वर्षीय आणि ३० वर्षीय दोन तरुणी आढळून आल्या. पोलिसांनी त्यांचे जबाब नोंदवून त्यांची सुटका केली. या प्रकरणी रेणुका कला केंद्राचा मालक रामनाथ ढाकणे, मॅनेजर शेख शफीक शेख हमीद आणि पार्टी मालकीण मिना संतोष खराडे यांच्या विरोधात केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मालक रामनाथ ढाकणे हा सध्या फरार असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत. तपास पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे करत आहेत.

वादग्रस्त रेणुका कला केंद्र

रेणुका कला केंद्र हे यापूर्वीही अनेक कारणांनी वादग्रस्त ठरले आहे. २०१९ मध्ये येथे पोलिसांनी छापा टाकून १६ जणांना ताब्यात घेतले होते. या कला केंद्रात काम करणाऱ्या शितल कांबळे हिचा बरड फाट्यावरील राजयोग लॉजमध्ये नेऊन खून केला होता. याप्रकरणी रामनाथ ढाकणे यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल केला होता. तर या कला केंद्रात नर्तकी म्हणून काम करीत असलेला तृतीय पंथी गार्गी ढलपे हिने मस्साजोग येथील अजिंक्य लॉज मध्ये ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती.

केज तालुक्यातील रेणुका कला केंद्रावर पुन्हा एकदा वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करून महिलांची सुटका केली असून, फरार मालकाचा शोध सुरू आहे. या प्रकरणामुळे रेणुका कला केंद्र पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news