Kaij Police Station Clash | केज ठाण्यात पोलिसांसमोरच दोन गटांत राडा; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

तक्रारदारांमध्ये झोंबाझोंबी; खुर्ची उचलून मारण्याचा प्रयत्न
kej police station complainants clash
kej police station complainants clashPudhari
Published on: 
Updated on: 

kej police station complainants clash

केज : मारहाणीची तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात आलेल्या तक्रारदारासह दुसऱ्या गटातील व्यक्तींमध्ये कर्तव्यावर असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांसमोरच झोंबाझोंबी झाली. या वेळी एका व्यक्तीने पोलीस ठाण्यातील खुर्ची उचलून दुसऱ्या महिलेच्या डोक्यात मारण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने खुर्ची हिसकावून घेण्यात आली. या प्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना १२ ऑक्टोबर रोजी रात्री सुमारे ११.४५ वाजता केज पोलीस ठाण्यात घडली. त्या वेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश क्षीरसागर, पोलीस उपनिरीक्षक राजू वाघमारे, पोलीस हेडकॉन्स्टेबल बाळासाहेब अहंकारे तसेच महिला पोलीस कॉन्स्टेबल तरकसे आणि सांगळे कर्तव्यावर उपस्थित होते.

kej police station complainants clash
Kaij Theft | केज पोलिसांचा सीईआयआर प्रणालीच्या मदतीने शोध; चोरलेले १४ मोबाईल मूळ मालकांना परत

कोल्हेवाडी (ता. केज) येथील महादेव प्रकाश आघाव (वय २६) हे आपल्याला झालेल्या मारहाणीची तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात आले होते. त्यांना वैद्यकीय उपचारासाठी पत्र देण्याची प्रक्रिया सुरू असतानाच केज येथील जलाल नगर परिसरात राहणाऱ्या अर्चना प्रकाश आघाव, लता प्रकाश आघाव आणि संगीता बाळू नेहरकर या तेथे आल्या. त्यांनी महादेव आघाव यांना मोठमोठ्याने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

यामुळे वाद वाढला. महादेव आघाव यांनी पोलीस ठाण्यातील खुर्ची उचलून अर्चना आघाव यांना मारण्यासाठी उगारली. मात्र, तेथे उपस्थित असलेल्या पोलीस हेडकॉन्स्टेबल बाळासाहेब अहंकारे यांनी तत्काळ हस्तक्षेप करून त्यांच्या हातातील खुर्ची हिसकावून घेतली. त्यानंतर दोन्ही गटांमध्ये झोंबाझोंबी झाली.

kej police station complainants clash
Kaij Student Death | बहिणीच्या शिक्षणाची चिंता; १६ वर्षीय विद्यार्थ्याने उचलले टोकाचे पाऊल

पोलीस ठाण्यातच पोलिसांसमोर घडलेल्या या प्रकाराची पोलिसांनी गंभीर दखल घेतली. पोलीस उपनिरीक्षक राजू वाघमारे यांच्या तक्रारीवरून महादेव प्रकाश आघाव, अर्चना प्रकाश आघाव, लता प्रकाश आघाव आणि संगीता बाळू नेहरकर या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल राम पवार या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news