

केज : केज येथील बस स्टँडवर वारंवार होणाऱ्या चोऱ्या रोखण्यात पोलिसांना यश आले असून पोलिसांनी तिघांची टोळी ताब्यात घेतली आहे. या पकडलेल्या आरोपींपैकी एकावर खुनाचा गुन्ह्यात त्याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. तो कारागृहातून पॅरोलवर सुट्टीवर आल्या पासून पुन्हा कारागृहात गेलेला नव्हता. तो फरार होता.
तर दुसरा आरोपी हा त्याच्यावर राज्यात वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात सोळा चोरीचे गुन्हे दाखल आहेत. तर तिसरा मात्र केज बस स्थानकात हमाली करणारा हमाल असून तो त्यांना प्रवाशांची माहिती देत होता.