Kej Girl Kidnapped | चुलते-पुतण्याचे संगनमत; अल्पवयीन मुलीचे फूस लावून अपहरण

केज तालुक्यातील प्रकार; दोघांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल
Girls Kidnapping
Girls KidnappingPudhari
Published on
Updated on

Kej Minor Girl Kidnapped

केज : केज तालुक्यातील एका गावातून चुलते-पुतण्याने संगनमत करून १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मुलीच्या आईच्या तक्रारीवरून दोघांविरुद्ध केज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित अल्पवयीन मुलगी १६ वर्षे दोन महिन्यांची आहे. १ सप्टेंबर रोजी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी तिला फूस लावून पळवून नेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असताना मुलीच्या आईने सचिन भारत नाईकवाडे आणि त्याचा चुलता रवी नाईकवाडे (रा. साळिंबा, ता. वडवणी, जि. बीड) यांच्यावर संशय व्यक्त केला. त्यानुसार केज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Girls Kidnapping
Beed News | ‘पटवा हटवा’च्या घोषणां देत कडा शहर कडकडीत बंद! संतप्त नागरिकांचा तीव्र आक्रोश

दरम्यान, अपहरण झालेल्या मुलीचे वर्णन पोलिसांनी दिले आहे. तिचा रंग गोरा असून अंगकाठी सडपातळ आहे. उंची सुमारे पाच फूट असून नाक लहान, केस लांब व काळे आहेत. ती मराठी भाषा बोलते. अपहरणाच्या वेळी तिच्या पायात सोनेरी रंगाच्या चपला, अंगात पिवळ्या रंगाचा पंजाबी ड्रेस आणि नाकात रिंग होती.

या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेडकॉन्स्टेबल राजू वंजारे करीत आहेत. मुलीचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news