

केज : केज तालुक्यात ८० वर्षीय वृद्धाने केला ७० वर्षाच्या भावजयीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. केज तालुक्यातील युसुफवडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक ७० वर्षीय वृद्ध महिला म्हैस चारीत असताना तिचा ८० वर्ष वयाचा दीर तेथे आला. त्याने तिच्याशी म्हैस चारण्याच्या कारणावरून भांडण करून शिविगाळ केली. तसेच वृद्ध भावजईला त्याने गुप्तांग दाखवून तिचा विनयभंग केला.
या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारी वरून ८० वर्षाच्या दिरा विरुद्ध युसुफ वडगाव पोलीस ठाण्यात गु. र. नं. १५१/२०२५ भा. न्या. सं. ७४, ७५, ७९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलिस कांगणे या पुढील तपास करीत आहेत.