Beed Drowning Death | पोहताना कमरेचा थर्माकोल तुटला; मुलाचा ३५ फूट खोल विहिरीत बुडून मृत्यू

केज तालुक्यातील सांगवी शिवारात विहिरीत पोहताना दुर्घटना
Kej Sangvi Shivar drowning case
Kej Sangvi Shivar drowning casePudhari
Published on
Updated on

Kej Sangvi Shivar drowning case

केज : तालुक्यातील सांगवी शिवारात विहिरीत बुडून १४ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि. ३०) घडली. बचाव पथकाच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली.

पिंपळगाव (ता. केज) येथील विराज विशाल शिंगारे (वय १४) हा आपल्या मित्रांसोबत पोहायला शिकण्यासाठी सांगवी शिवारातील बाळासाहेब केदार यांच्या शेतातील विहिरीवर गेला होता. पोहण्यासाठी त्याने कमरेला थर्माकोल बांधून विहिरीत उडी मारली. मात्र थर्माकोल तुटल्याने तो सुमारे ३५ फूट खोल पाण्यात बुडाला आणि त्याचा मृत्यू झाला.

Kej Sangvi Shivar drowning case
Beed News : माता, बाल संगोपनात बीड पहिल्या क्रमांकावर

घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे, सहाय्यक फौजदार पी. टी. चव्हाण, शंभू दराडे आणि होमगार्ड सुरज भैरट यांनी घटनास्थळी धाव घेतली. सुरुवातीला स्थानिक पातळीवर मृतदेह शोधण्याचे प्रयत्न करण्यात आले; मात्र यश न आल्याने बाहेरील बचाव पथकाची मदत घेण्यात आली.

पैठण येथील बचाव पथकाने घटनास्थळी येऊन शोधमोहीम राबवत सायंकाळी ६.३० वाजता मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविला असून पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news