Kaij Illegal Liquor Raid | केज तालुक्यात अवैध दारूविक्रीविरोधात पोलिसांची धडक कारवाई; चार ठिकाणी छापे

दारूसह स्कॉर्पिओ व दुचाकी असा २३ लाख ७८ हजारांचा मुद्देमाल जप्त
Illegal Liquor Raid
Illegal Liquor RaidAI Photo
Published on
Updated on

Beed Kaij Illegal Liquor Raid

केज : केज तालुक्यात अवैध दारूविक्री आणि चोरट्या दारू वाहतुकीविरोधात युसुफवडगाव व केज पोलिसांनी स्वतंत्र कारवाया केल्या. चार ठिकाणी केलेल्या या कारवाईत देशी, गावठी आणि विदेशी दारूसह एक स्कॉर्पिओ व मोटारसायकल असा एकूण २३ लाख ७८ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला. या प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

युसुफवडगाव पोलिस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप मांजरमे यांनी अवैध व चोरट्या दारूविक्रीविरोधात कारवाईचा धडाका सुरू केला आहे. गुरुवारी (दि. १०) माळेगाव येथील चौकात पोलिसांनी काळ्या रंगाची स्कॉर्पिओ (एमएच ४४ एई ५०३१) अडवून तपासणी केली. या वाहनातून १२ हजार रुपये किमतीची रॉयल स्टॅग विदेशी दारू अवैधरीत्या वाहतूक केली जात असल्याचे आढळले. याप्रकरणी नाव्होली येथील बप्पाजी बिक्कड याला ताब्यात घेण्यात आले.

Illegal Liquor Raid
Beed Crime News : रुचकर जेवणासाठी प्रसिद्ध मांजरसुंबा बनतोय अवैध धंद्यांचे हब

त्यानंतर बनसारोळा येथील हनुमान मंदिराजवळ सुधाकर दत्तू जोगदंड हा अवैधरीत्या दारूविक्री करताना आढळून आला. त्याच्याकडून १३ हजार रुपये किमतीचे मद्य जप्त करण्यात आले.

धनेगाव फाटा येथेही पोलिसांनी कारवाई करत २ हजार २०० रुपयांची दारू आणि ५५ हजार रुपये किमतीची मोटारसायकल ताब्यात घेतली. या प्रकरणी धम्मदीप जोगदंड आणि समाधान वैरागे यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली.

दरम्यान, केज पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांच्या आदेशाने वरपगाव येथील बन्सी पवार याच्याविरुद्धही अवैध गावठी दारू प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे.

अवैध दारूविक्री आणि वाहतुकीविरोधात पोलिसांनी सुरू केलेल्या या कारवायांमुळे तालुक्यातील अवैध दारू विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news