Georai Taluka Alert | जायकवाडी धरणातून विसर्ग वाढविला: गेवराई तालुक्यातील गोदाकाठी पुन्हा सतर्कतेचा इशारा

Beed Flood Alert | गोदावरी नदीपात्रात अतिरिक्त ९४३२ क्युसेक विसर्ग सुरू
Godavari river flood
गेवराई तालुक्यातील गोदाकाठी पुन्हा सतर्कतेचा इशारा Pudhari
Published on
Updated on

Jayakwadi dam water release Godavari river flood

सुभाष मुळे

गेवराई : जायकवाडी प्रकल्प, नाथसागर जलाशय, पैठण येथून आज (दि. २८) दुपारी १२ ते १२.३० या वेळेत विसर्ग वाढविण्यात आला आहे. या दरम्यान धरणाचे द्वार क्र. १० ते २७ असे एकूण १८ नियमित दरवाजे ०.५ फूट उचलून ६.० फूट पर्यंत उघडण्यात आले आहेत. त्यामुळे गोदावरी नदीपात्रात अतिरिक्त ९४३२ क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे.

यामुळे सध्या १८ नियमित व ०९ आपत्कालीन गेटमधून मिळून १४१४८० + ९४३२ = १५०९१२ क्युसेक इतका एकूण विसर्ग सुरू आहे. पूर नियंत्रण कक्ष, जायकवाडी प्रकल्प प्रशासनाने माहिती दिली आहे की, आवक लक्षात घेऊन विसर्गात वेळोवेळी वाढ अथवा घट करण्यात येईल. त्यामुळे नदीकाठच्या गावांतील जनतेने सावधगिरी बाळगावी, अनावश्यक नदीकाठाशी संपर्क टाळावा तसेच पशुधन व शेतीसंबंधी साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Godavari river flood
Beed Rain : बीड जिल्ह्यात पुन्हा पावसाचा रुद्रावतार !

बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातून गोदावरी नदीचा प्रवाह जात असल्याने येथेही नागरिकांनी सतर्क राहावे. विशेषतः नांदूर हवेली, खामगाव, हिवरा, दिंडी, तडवळे, आणि नदीकाठच्या वस्तीवर राहणाऱ्या गावकऱ्यांना प्रशासनाने पूरस्थितीचा धोका लक्षात घेऊन सतर्कतेचा इशारा दिला आहे. दरम्यान स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे पूर नियंत्रण कक्षाकडून आवाहन करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news