Parli Irrigation Office | 'पाटबंधारे कार्यालय परळीतून जाणार': 'दै. पुढारी'च्या वृत्ताची धनंजय मुंडेंकडून दखल, थेट मुख्यमंत्र्यांशी पत्रव्यवहार

पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता कार्यालय परळी वैद्यनाथ येथून स्थलांतरित करू नये, यासाठी आपण प्रयत्नशील आहोत
Parli Irrigation Office
Parli Irrigation OfficePudhari
Published on
Updated on

Dhananjay Munde on Irrigation Department Office

परळी वैद्यनाथ : 'पाटबंधारे मंडळ कार्यालय परळीतून जाणार' असे वृत 'दै. पुढारी'तून प्रसिद्ध होताच हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याबाबत आपण थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी पत्रव्यवहार केल्याची माहिती माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.

पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता कार्यालय परळी वैद्यनाथ येथून स्थलांतरित करू नये, यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. तसेच मुख्यमंत्र्यांनी जलसंपदा विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांना याबाबत सकारात्मक कार्यवाही करण्याचे निर्देशही दिलेले आहेत, अशी माहिती मुंडे यांनी दिली आहे.

Parli Irrigation Office
Beed News | घरातून रागात निघून गेलेला 13 वर्षांचा अल्पवयीन मुलगा 24 तासांत सुखरूप नातेवाईकांच्या ताब्यात

परळी वैद्यनाथ येथील पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता कार्यालय परळी येथून परभणी येथे स्थलांतरित करण्यात येत असल्याबाबत 'दै. पुढारी'ने वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्याबाबत मुंडे यांनी आपण चार महिन्यांपासून पाठपुरावा करत असल्याची माहिती दिली.

परळी वैद्यनाथ येथील पाटबंधारे विभागाच्या कार्यालयाच्या माध्यमातून बीड सह लातूर व परभणी जिल्ह्यातील काही भागाचे कामकाज सुरळीतपणे सुरू आहे. या कार्यालयाची स्थापना १९९५ साली करण्यात आलेली असून प्रशासकीय कारणास्तव हे कार्यालय स्थलांतरित करण्याची प्रक्रिया विभागाने प्रस्तावित केली होती. मात्र, या कार्यालयाची इमारत सुस्थितीत असून कामकाज व्यवस्थितपणे सुरू आहे, तसेच तिन्ही जिल्ह्यांच्या कामकाजाच्या हिशोबाने परळी हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने हे कार्यालय बंद किंवा स्थलांतरित करण्यात येऊ नये.अशी विनंती मुंडे यांनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना लेखी पत्राद्वारे केलेली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news