

Gevrai bike crash
गेवराई: तालुक्यातील मालेगाव फाटा परिसरात भरधाव दुचाकीच्या धडकेत एक तरुण जखमी झाल्याची घटना मंगळवारी गेवराई तालुक्यातील मालेगाव फाटा येथे घडली. याबाबत गेवराई तालुक्यातील आडगाव पिंप्री येथील लहू पांडुरंग साळुंके (वय ३९) यांनी बुधवारी (दि. २५) उशिरा तक्रार दाखल केली.
यानुसार, त्यांचा पुतण्या सागर सखाराम साळुंके हा आपल्या ताब्यातील दुचाकी (क्र. एमएच-२३ बीके-१७५१) घेऊन जात असताना आरोपी देविदास नारायण शिंदे (रा. आडगाव पिंप्री, ता. गेवराई) याने निष्काळजीपणे व भरधाव वेगाने वाहन चालवत त्यास धडक दिली. या अपघातात सागर साळुंके गंभीर जखमी झाला. या प्रकरणी चकलांबा पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध निष्काळजीपणे वाहन चालविल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस कर्मचारी पवार हे करीत आहेत.