

केज :- वैद्यकीय शिक्षणासाठी मॅनेजमेंट कोट्यातून प्रवेश मिळून देतो असे सांगून विद्यार्थी आणि पालकांना लाखो रु. चा चुना लावणारा संशयित आरोपी श्री.४२० सौरभ कुलकर्णी हा सांगली जिल्ह्यात तासगाव पोलिस ठाणे हद्दीत घडलेल्या शोभेची दारू बनवित असताना स्फोट होऊन त्यात आठजण जखमी झाले होत्या त्या प्रकरणात देखील आरोपी आहे.
वैद्यकीय शिक्षणासाठी मॅनेजमेंट कोट्यातून प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून महाराष्ट्रासह अनेक राज्यातील विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांची फसवणूक करून त्यांच्याकडून कडून लाखो रु. उकळणाऱ्या महाठक श्री ४२० सौरभ कुलकर्णी याला दि. १३ जानेवारी रोजी केज विभागाचे सहाय्यक पोलिस अधीक्षक व्यंकटराम यांच्या पथकातील पोलिस उपनिरीक्षक सय्यद जावेद कराडकर, पोलिस उपनिरीक्षक अमिरोद्दीन इनामदार आणि अनिल मंदे यांनी कराड येथून त्याच्या मुसक्या आवळल्या होत्या.
सौरभ कुलकर्णी याचे अनेक कारनामे उघड होत आहेत.
मागील वर्षी चार महिन्या पूर्वी सांगली जिल्ह्यातील तासगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत सुरक्षेची कोणतीही दक्षता न घेता अवैधरित्या शोभेची दारू बनविताना स्फोट झाला होता या स्फोटात आठ जण गंभीर जखमी झाले होते. त्या स्फोटात देखील हा श्री ४२० सौरभ कुलकर्णी आणि आंनदा नारायण यादव, विवेक आनंदराव पाटील, गजानन शिवाजी यादव, अकुंश शामराव घोडके, प्रणव रविंद्र आराध्ये, ओंकार रविंद्र सुतार हे त्याचे 6 साथीदार (रा.सांगली जिल्ह्यातील कवठे एकंद गावामध्ये ब्राम्हण गल्ली) यांचा समावेश होता.
काय आहे ते स्फोट प्रकरण ?
- दि. २८ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी १:३० ते २:०० वाजण्याच्या दरम्यान सांगली जिल्ह्यातील कवठे एकद गावातील गट नंबर ५६७ मध्ये मध्ये असलेल्या ब्राम्हण गल्लीतील सुतार समाज मंदिरामध्ये संबधीत सुरक्षिततेची कोणतीही खबरदारी न घेता अवैध्य पद्धतीने शोभेची दारू तयार करीत होते. त्यावेळी तेथे मोठा स्फोट होऊन त्या स्फोटात स्वतः सौरभ कुलकर्णीसह त्याचे साथीदार जखमी झाले होते. या प्रकरणी पोलीस कर्मचारी श्रीकांत अभंगे यांच्या तक्रारी वरून तासगाव पोलिस ठाण्यात सात जणांच्या विरुद्ध तासगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या स्फोट प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक राजू अन्नछत्रे हे करीत आहेत.