Beed Fraud News | न्यायालयात लिपीक असलेल्या मामाने भाच्याला दाखवलेली ऑर्डर ही बनावट?

न्यायालयातील लिपिक पदाची नोकरीची दिली बनावट ऑर्डर
Beed Fraud News
Beed Fraud News
Published on
Updated on

केज :- स्वतःच्या सख्ख्या भाच्याला नोकरी लावण्याचे अमिष दाखवून बनावट ऑर्डर देऊन १९ लाख रु. फसवणूक केलेल्या मामाने ज्या एकाची कर सहाय्यक पदाची ऑर्डर दाखवून भाच्याचा विश्वास संपादन केला ती ऑर्डर देखील फसवणूक झालेले अमोल चिगुरे यांच्या कडून उपलब्ध झाली आहे. दरम्यान फसवणूक झाल्याने मामाविरोधात केज पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. प्रभारी पोलिस अधिकारी पोलिस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक उमेश निकम हे तपास करीत आहेत.

चार वर्षा पूर्वी सन २०२२ मध्ये परभणी जिल्ह्यातील जिल्हा सत्र न्यायालया मध्ये कनिष्ठ लिपिक असलेल्या दगडू हंगरगे याने त्याचा सख्खा भाचा अमोल चिगुरे याला महसूल विभागात नोकरी लावण्याचे अमिष दाखविले. त्याचे मंत्रालयात ओळखी असल्याचे सांगून त्याचा विश्वास संपादन करून त्याने १५ लाख रु. त्यासाठी देण्यासाठी तयार व्हावे, म्हणून त्याला जी एका व्यक्तीची दि. ९ नोव्हेंबर २०२२ या तारखेची, आयकर खात्यातील कर सहाय्यक पदाची ऑर्डर दाखविली . तसेच अमोल याला दिलेली ती ऑर्डर न्यायालयाची आणि सही मात्र जिल्हाधिकारांची आहे. ही ऑर्डर घेऊन भाचा न्यायालयात रुजु होण्यासाठी गेल्या नंतर ही ऑर्डरच बनावट असल्याचा प्रकार उघडकीस आला.

ती ऑर्डर ही परभणी येथील एका व्यक्तिची असून. त्यामध्ये अर्थ मंत्रालया अंतर्गत असलेल्या आयकर विभागातील कर सहाय्यक अर्थात इन्कम टॅक्स असिस्टंट म्हणून असून त्या ऑर्डर मध्ये नियुक्तीचे ठिकाण हे आयकर भवन, महर्षी कर्वे रोड, चर्चगेट येथील कार्यालयात ०५ डिसेंबर २०२२ ते ११ डिसेंबर २०२२ दरम्यान, नियम व अटीच्या शर्थीवर रुजू होण्या संबंधीचे आदेश आहेत.

दरम्यान, दाखवलेली ऑर्डर खरी किंवा बनावट आहे हे समजू शकले नाही, मात्र अमोल चिगुरे हे त्याचा मामा दगडू हंगरगे यांच्या नोकरीच्या खोट्या आमिषाला बळी पडला आणि १९ लाख रु. ची फसवणूक झाली. मात्र त्याच्या पदरी न्यायालयातील लिपिक पदाची ऑर्डर ही जिल्हाधिकाऱ्यांच्या बनावट सहीची पडली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news