

Beed Police Raid Gambling
केज : केज तालुक्यातील धनेगाव फाटा येथील हॉटेल सह्याद्रीमध्ये सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर अंबाजोगाई उपविभागाच्या अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके यांच्या पथकाने छापा टाकला. या कारवाईत ३ लाख ६३ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आठ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अप्पर पोलीस अधीक्षक तिडके यांना धनेगाव फाटा परिसरात हॉटेल सह्याद्रीमध्ये बेकायदेशीर जुगार सुरु असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार ३ सप्टेंबर रोजी सायंकाळी पथकाने छापा टाकून ही कारवाई केली.
कारवाईदरम्यान अशोक आश्रुबा सोनवणे, बसलिंग बाबुराव वाळके, विजयसिंह हरीभाऊ गायकवाड, कल्याण श्रीकृष्ण रांजणकर, ईश्वर विठ्ठल चौधरी, जनक शाहुराव गव्हाणे, लक्ष्मण विश्वनाथ पोटभरे आणि जयद्रथ मुकुंद आव्हाड या आठ जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून रोख रक्कम, जुगार साहित्य, सहा मोबाईल फोन आणि सहा मोटारसायकली जप्त करण्यात आल्या.
दरम्यान, हॉटेलचा मालक शामसुंदर दत्तोबा खोडसे याच्याविरोधातही कारवाई करण्यात आली आहे. पोलीस हवालदार संजय राठोड यांच्या फिर्यादीवरून युसुफवडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.