Beed Crime : 23 लाखांची फसवणूक करणाऱ्यांना बेड्या

बीड सायबर पोलिसांची जळगावमध्ये कारवाई
Beed Crime News
23 लाखांची फसवणूक करणाऱ्यांना बेड्याPudhari Photo
Published on
Updated on

परळी : बीड सायबर पोलिसांनी मोठी कारवाई करत डिजिटल अरेस्टच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला असून, या प्रकरणातील तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्यात तब्बल 23 लाख 42 हजार 888 रुपयांची फसवणूक झाल्याचे तपासात उघड झाले आहे.

सायबर पोलिस ठाणे, बीड येथे दाखल गुन्ह्यानुसार परळी वैजनाथ येथील तक्रारदार सूर्यकांत निवृत्ती मुंडे यांना डिजिटल अरेस्टची भीती दाखवून ऑनलाईन माध्यमातून मोठी रक्कम उकळण्यात आली होती. या प्रकरणी भारतीय न्यायसंहिता व माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Beed Crime News
Beed crime | बीड सायबर पोलिसांची मोठी कारवाई; “डिजिटल अरेस्ट” फसवणूक प्रकरणातील 3 आरोपी अटकेत

तपासादरम्यान पोलिसांनी आरोपींकडून 3 लाख रुपये रोख जप्त केले असून, आणखी 3.20 लाख रुपये विविध बँक खात्यांमध्ये गोठवले आहेत. आरोपी फसवणुकीतून मिळालेली रक्कम ऑनलाईन ट्रेडिंगच्या माध्यमातून स्वतःच्या फायद्यासाठी वापरत असल्याचेही निष्पन्न झाले आहे.

सायबर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण व डिजिटल पुराव्यांच्या आधारे आरोपींचा माग काढत जळगाव येथून त्यांना अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये प्रसन्न अजय कासट (31), स्वाती प्रसन्न कासट (26), संकेत दीपक बेलदार (22) यांचा समावेश आहे. या प्रकरणात आणखी काही आरोपी सहभागी आहेत का, तसेच इतर किती नागरिकांची फसवणूक झाली आहे, याचा सखोल तपास सध्या सुरू आहे.

Beed Crime News
Karad Fraud : शेखर चरेगावकरांना भोर पोलिसांकडून अटक

दरम्यान, बीड जिल्हा पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, डिजिटल अरेस्टसारख्या खोट्या धमक्यांना बळी पडू नये. पोलिस कधीही व्हिडिओ कॉलद्वारे अटक करत नाहीत. अशा प्रकारचे कॉल आल्यास त्वरित 1930 या सायबर हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधून तक्रार नोंदवावी. ही कारवाई पोलिस अधीक्षक, बीड यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलिस पथकाने यशस्वीपणे पार पाडली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news