Beed Crime |सावकारी पाश! व्याजाच्या पैशासाठी गेला तरुणाचा जीव : १५ दिवसानंतर दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

सावकाराच्या मारहाणीच्या त्रासाला कंटाळून २४ वर्षीय तरुणाची गळफास घेऊन संपवले जीवन
Crime
Crime
Published on
Updated on

केज :- सावकाराकडून भावाने घेतलेले पैशाच्या कारणा वरून केलेली मारहाण आणि त्रासाला कंटाळून युसुफवडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका २४ वर्षीय तरुणाने हिवरा खुर्द (ता. अंबाजोगाई) येथे चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली असून तब्बल १५ दिवसा नंतर दोघा विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

केज तालुक्यातील युसुफ वडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या हिवरा खुर्द तालुका अंबाजोगाई येथील अजय वैजनाथ यादव याने काही महिन्यांपूर्वी अंबाजोगाई येथील अमन कैलाश परदेशी व राधेश्याम नागनाथ नानवटे या दोघा सावकारांकडून व्याजाने पैसे घेतले होते. त्यातील काही रक्कम त्याने परत केली होती, परंतु घेतलेल्या पैशांपैकी उर्वरित व्याजाचे पैसे देणे राहिले असल्याने आणि तो आर्थिक अडचणीत असल्याने त्याच्याकडून वेळेवर पैसे देणे झाले नसल्याने तो त्याची पत्नी राहत असलेल्या ठिकाणी अकोला येथे गेला होता.

दरम्यान सावकार कैलाश परदेशी आणि राधेश्याम नानवटे या दोघांनी व्याजाच्या पैशाच्या कारणा वरून अजय यादव याचा भाऊ अक्षय वैजनाथ यादव याला "तू परतफेड कर किंवा तुझ्या भावाचा पत्ता दे." या कारणा वरून मारहाण केली. तसेच त्याचा शारीरिक व मानसिक छळ केला. त्यांच्या शारीरिक व मानसिक छळाच्या त्रासाला कंटाळून अक्षय यादव वय (२४ वर्ष) याने दि. १२ मार्च रोजी हिवरा खुर्द ता. अंबाजोगाई येथे चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.

या प्रकरणी मयत अक्षय यादव यांचे वडील वैजनाथ यादव यांच्या तक्रारी वरून तब्बल १५ दिवसा नंतर युसुफवडगाव पोलिस ठाण्यात गु. र. नं. ७६/२०२६ भा. न्या. सं. १०८, ११५(२), ३५१(२), ३५२, ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. युसुफवडगाव पोलिस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलिस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे हे स्वतः या प्रकरणाचा तपास करीत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news