Beed crime news: मंदिरात दर्शनासाठी जात असलेल्या तरुणास काठीने मारहाण

Beed crime news
Beed crime news
Published on
Updated on

गौतम बचुटे, केज : तालुक्यातील खरमाटा येथे देवदर्शनासाठी जात असलेल्या एका तरुणाला मंदिराच्या जवळच अडवून दोघांनी काठीने मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी ४ जणांविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

नेमकं काय घडलं?

बुधवारी (दि. १२) सकाळी ७:०० वाजता कैलास भिवसेन पवार नावाचा तरुण गावातील हनुमान मंदिरात दर्शनासाठी जात होता. त्याला मंदिराजवळ सुजित बिभीषण पवार आणि प्रमोद बिभीषण पवार यांनी अडवले. सुजित पवार याने कैलास पवार याला, "तू माझ्या बायकोला काय बोललास? तू माझ्या घरी का आलास?" असे विचारून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. कैलास पवार यांनी शिवीगाळ करू नका, असे म्हणताच सुजित आणि प्रमोद या दोघांनी त्यांना डोक्यात, छातीवर, पाठीवर आणि दोन्ही पायांवर काठीने बेदम मारहाण करून जखमी केले.

केज पोलिस ठाण्यात चौघांविरूद्ध गुन्हा दाखल

यादरम्यान बिभीषण लिंबा पवार आणि दैवशाला बिभीषण पवार हे देखील तेथे आले आणि त्यांनी लाथा-बुक्क्यांनी कैलास पवार यांना मारले. मारहाणीचा आवाज ऐकून कैलास यांची आई सुरेखा भिवसेन पवार या तेथे धावून आल्या असता, प्रमोद पवार आणि सुजित पवार यांनी त्यांनाही केसाला धरून चापटा-बुक्क्यांनी मारहाण केली. सुजित पवार याने आईच्या उजव्या पायाच्या गुडघ्यावर काठीने मारून मुक्कामार दिला आणि जिवे मारण्याची धमकी दिली. या घटनेनंतर कैलास भिवसेन पवार यांच्या तक्रारीवरून केज पोलिस ठाण्यात सुजित बिभीषण पवार, प्रमोद बिभीषण पवार, बिभीषण लिंबा पवार आणि देवशाला बिभीषण पवार या चौघांविरुद्ध भा. न्या. सं.च्या संबंधित कलमांनुसार (गु. र. नं. ६२५/२०२५) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस जमादार उमेश आघाव हे पुढील तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news